IND vs AUS 3rd Test 2021: दुखापतग्रस्त रवींद्र जडेजा फलंदाजीस मैदानावर उतरणार? पहा ही मोठी अपडेट
पहिल्या डावात नाबाद 28 धावा आणि 4 विकेट घेणारा जडेजा पेनकिलर इंजेक्शन घेऊन सिडनी येथे अंतिम सामन्यात फलंदाजीसाठी बाहेर पडू शकतो. “कसोटी वाचवण्यासाठी इंजेक्शन घेऊन आवश्यक असल्यास फलंदाजी करू शकेल,” सूत्रांनी पुढे म्हटले.
IND vs AUS 3rd Test 2021: ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) सिडनी कसोटीच्या (Sydney Test) तिसऱ्या दिवशी भारतीय संघाचा वरिष्ठ अष्टपैलू रवींद्र जडेजाच्या (Ravindra Jadeja) अंगठ्याला दुखापत झाली ज्यामुळे तो दुसऱ्या डावात गोलंदाजीची देखील मैदानावर उतरला नाही. जडेजाची दुखापत गंभीर असल्यामुळे त्याला त्याला चौथ्या ब्रिस्बेन कसोटी सामन्यालाही मुकावे लागणार आहे. शिवाय, जडेजा इंग्लंडविरुद्ध (England) आगामी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमधून बाहेर पडला आहे. मिचेल स्टार्कचा एक शॉर्ट बॉल ग्लोव्ह्जवर लागल्यांनंतर जडेजाला ऑस्ट्रेलियाच्या दुसर्या डावात गोलंदाजी करता आली नाही, आणि त्याच्या दुखापतीवर तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी लागली. बीसीसीआयच्या एका सूत्रांनी PTI ला सांगितले की, "रवींद्र जडेजा इंग्लंडविरुद्ध पहिल्या दोन कसोटी सामन्यांमधून बाहेर पडला आहे. त्याला पुनर्वसन व पूर्ण फिटनेस मिळवण्यासाठी किमान 4 ते 6 आठवडे लागतील." इंग्लंडविरुद्ध चार कसोटी सामन्यांच्या मालिकेची सुरुवात चेन्नई येथे 5 फेब्रुवारीपासून डबल-हेडर सामन्याने होईल. (IND Vs AUS: भारतीय क्रिकेट संघाला मोठा धक्का; दुखापतीमुळे रविंद्र जाडेजा संघाबाहेर)
ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या डावात नाबाद 28 धावा आणि 4 विकेट घेणारा जडेजा पेनकिलर इंजेक्शन घेऊन सिडनी येथे अंतिम सामन्यात फलंदाजीसाठी बाहेर पडू शकतो. “कसोटी वाचवण्यासाठी इंजेक्शन घेऊन आवश्यक असल्यास फलंदाजी करू शकेल,” सूत्रांनी पुढे म्हटले. दुसरीकडे, जडेजा वगळता युवा भारतीय फलंदाज रिषभ पंतला देखील पहिल्या डावात फलंदाजी दरम्यान उजव्या हाताच्या कोपऱ्याला दुखापत झाली होती, मात्र चौथ्या दिवशी ब्रेक घेत पाचव्या दिवशी पंतने झुंजार अर्धशतकी खेळी करत 97 धावा केल्या आणि संघाच्या विजयाच्या आशा पल्लवित ठेवल्या. ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर-गावस्कर मालिकेत टीम इंडियाला खेळाडूंच्या दुखापतीनां सामोरे जावे लागले. ज्येष्ठ वेगवान गोलंदाज उमेश यादव आणि मोहम्मद शमी आधीच मायदेशी परतले होते. त्यांनतर, मेलबर्नमधील नेटमध्ये फलंदाजी करताना डाव्या मनगटाला दुखापत झाल्यानंतर फलंदाज केएल राहुल देखील मालिकेतून बाहेर पडला.
दरम्यान, पंतच्या जागी कांगारू संघाविरुद्ध दुसऱ्या डावात रिद्धिमान साहाने विकेटकिपिंगची जबाबदारी सांभाळली. जडेजा आणि पंत दोघांनाही स्कॅनसाठी घेण्यात आले होते पण सुदैवाने पंतची दुखापत जडेजा इतकी गंभीर नाही.