IND vs AUS 3rd ODI: रोहित शर्मा याचे तुफानी शतक, ऑस्ट्रेलियाला 7 विकेटने पराभूत करत मालिकेत 2-1 ने मिळवला विजय
ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 287 लक्ष्याच्या प्रत्युत्तरात भारतीय संघाने सलामी फलंदाज रोहित शर्मा याचे शतक आणि कर्णधार विराट कोहली याच्या 89 धावांच्या खेळीच्या मदतीने विजयाची नोंद केली.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेतील तिसऱ्या वनडे सामन्यात टीम इंडियाने 7 विकेटने विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 287 लक्ष्याच्या प्रत्युत्तरात भारतीय संघाने सलामी फलंदाज रोहित शर्मा (Rohit Sharma) याचे शतक आणि कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याच्या 89 धावांच्या खेळीच्या मदतीने विजयाची नोंद केली. मुंबईतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलिया, तर राजकोट आणि आजच्या सामन्यात विजय मिळवत मालिका 2-1 ने जिंकली. बेंगळुरूमधील सामन्यात रोहितने सर्वाधिक 119, तर विराट धावा करून नाबाद परतला. मनीष पांडे (Manish Pandey) आणि श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) अय्यरने अनुक्रमे नाबाद 8 आणि 44 धावा केल्या. केएल राहुलने (KL Rahul) 27 चेंडूत 19 धावांचे योगदान दिले. संपूर्ण सामन्यात भारतीय संघाने वर्चस्व कायम ठेवले. गोलंदाजांनंतर फलंदाजांनीही अपेक्षापूर्ती करत शानदार विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाकडून अॅडम झांपा आणि अॅस्टन टर्नर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. आजच्या सामन्यात रोहितची शतकी खेळी महत्वाची ठरली. नवीन वर्षातील भारताचा वनडेमधील पहिला विजय आहे. (बेंगळुरू सामन्यात विराट कोहली याने मोडला एमएस धोनी चा वर्ल्ड रेकॉर्ड, कर्णधार म्हणून पूर्ण केल्या सर्वात जलद 5000 वनडे धावा)
यापूर्वी, या निर्णायक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंचने टॉस जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि स्टीव्ह स्मिथच्या शतकी खेळीच्या मदतीने 9 विकेट गमावून 286 धावा केल्या. भारताकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक 4 फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. दुसरीकडे, झांपा आणि टर्नरशिवाय अन्य भारतीय गोलंदाज विकेट घेण्यात अपयशी ठरले.
ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 287 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत शिखर धवन जखमी झाल्याने भारतीय डावाची सुरुवात रोहितसह राहुलने सुरुवात केली. दोघांनीही पहिल्या 10 ओव्हरमध्ये एकही विकेट न गमावता 61 धावा केल्या. मात्र, काही ओव्हरनंतर ऑस्ट्रेलियन फिरकी गोलंदाजांनी वर्चस्व गाजवले आणि राहुलला अगरने 19 धावांवर बाद केले. रोहितने 110 डावाच्या खेळीत वनडे कारकीर्दीतील 29 वे शतक ठोकले. ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे सामन्यातील हे त्याचे 8 वे शतक होते. दुसरीकडे कोहलीने 61 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले.