IND vs AUS 2nd Boxing Day Test Day 2: विराट कोहली आणि सौरव गांगुली यांना जे शक्य झाले नाही ते अजिंक्य रहाणेने करून दाखवले!
ऑस्ट्रेलियामध्ये कसोटीतील रहाणेने आपल्या कसोटी कारकीर्दीतील पाचवे अर्धशतक ठोकले. विराट आणि गांगुली यांनी ऑस्ट्रेलियामध्ये खेळत प्रत्येकी चार अर्धशतक केले आहेत.
IND vs AUS 2nd Test Day 2: ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) दुसर्या बॉक्सिंग डे टेस्ट (Boxing Day Test) सामन्याच्या दुसर्या दिवशी भारतीय संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणेने (Ajinkya Rahane) अशी कामगिरी केली जे विराट कोहली (Virat Kohli) आणि सौरव गांगुली यांनाही नाही जमली. रहाणेने आपल्या कसोटी कारकीर्दीतील 23वे अर्धशतक ठोकत रेकॉर्ड ब्रेक कामगिरीची नोंद केली. ऑस्ट्रेलियामध्ये कसोटीतील रहाणेचे हे पाचवे अर्धशतक आहे. विराट आणि गांगुली यांनी ऑस्ट्रेलियामध्ये खेळत प्रत्येकी चार अर्धशतक केले आहेत. याशिवाय, मिचेल स्टार्कने पंतला बाद केले आणि कसोटी करिअरमधील 250 विकेट पूर्ण केले तर रहाणे अर्धशतकासह भारताचा डाव सावरला. शिवाय, बॉक्सिंग डे कसोटीत रहाणे ऑस्ट्रेलियाविरुद्ध 50 किंवा त्याहून अधिक खेळी करणारा सहावा भारतीय कर्णधार ठरला. कपिल देव यांनी 1985 बॉक्सिंग डे कसोटीत सर्वप्रथम ऑस्ट्रेलियाविरूद्ध हा पराक्रम केला होता. त्यानंतर 1999 मध्ये गांगुलीने, 2003 मध्ये पुन्हा एकदा गांगुलीने हे काम केले, तर 2018 मध्ये, विराट कोहलीने बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात पन्नासहून अधिक धावा केल्या होत्या. (IND vs AUS 2nd Test Day 2: अजिंक्य रहाणेचे दमदार अर्धशतक, Tea पर्यंत भारताचा स्कोर 189/5)
दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात हा 100 वा कसोटी सामना खेळला जात आहे. भारतासह 100 कसोटी सामने खेळणारा इंग्लंडनंतर ऑस्ट्रेलिया दुसरा देश ठरला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात लाला अमरथन यांनी भारताचे नेतृत्व केले होते. यानंतर 25व्या कसोटीत नवाब पटौदी भारताचे कर्णधार होते तर 50व्या कसोटीत अझरुद्दीन आणि अनिल कुंबळे यांनी 75व्या कसोटीत भारताचे नेतृत्व केले होते. भारताचा नियमित कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वात अजिंक्य रहाणेकडे कर्णधारपद सोपवण्यात आले आहेत.
दरम्यान, बॉक्सिंग डे टेस्ट मॅचमध्ये रहाणेने पुढाकार घेत संघाचे नेतृत्व केले. टॉस गमावून पहिले गोलंदाजी करत त्याने काही चकित करणारे निर्णय घेत आक्रामक भूमिका निभावली. गरजेनुसार योग्य बॉलिंग चेंज, फिल्ड प्लेसमेंट अशा निर्णयांमधून त्याने कांगारू संघाला वरचढ होऊ दिले नाही आणि ऑस्ट्रेलिया आपल्या पहिल्या डावात 195 धावांपर्यंतच मजल मारू शकला तर हा लेख लिही पर्यंत भारताने 5 विकेट गमावून 232 धावा केल्या आहेत आणि ऑस्ट्रेलियावर 37 धावांची आघाडी घेतली आहे.