IND vs AUS 2nd ODI: राजकोट सामन्यात बनले 'हे' 10 प्रमुख रेकॉर्डस्; रोहित शर्मा, विराट कोहली यांनीही केली विक्रमांची नोंद

या दुसर्‍या वनडे सामन्यात दोन्ही संघांनी बरेच उत्कृष्ट आणि मनोरंजक विक्रमं नोंदविली आहेत. जाणून घ्या.

भारत-ऑस्ट्रेलिया (Photo Credit: IANS)

भारतीय संघाने (Indian Team) त्यांच्या शानदार कामगिरीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने (Australia) राजकोट येथे खेळल्या गेलेल्या दुसर्‍या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाला 36 धावांनी पराभूत केले आणि आता 2 सामन्यांनंतर 1-1 अशी मालिकेत बरोबरीत केली. पहिले फलंदाजी करत भारताने ऑस्ट्रेलियाला 341 धावांचे विशाल लक्ष्य दिले होते, मात्र ऑस्ट्रेलिया संघाला दाही विकेट गमावून 304 धावांपर्यंत मजल मारता आली. ऑस्ट्रेलियाकडून स्टिव्ह स्मिथ (Steve Smith) याने सर्वाधिक 98 धावा केल्या आणि मार्नस लाबूशेन याने 46 धावा करून त्याला महत्वाची साथ दिली. मोहम्मद शमी (Mohammed Shami) याने 3 गडी, तर रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, नवदीप सैनी यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. जसप्रीत बुमराह याला 1 विकेट मिळाली.  भारताने आजच्या सामन्यात बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग या तिन्ही विभागात प्रभावी कामगिरी केली. (IND vs AUS 2nd ODI: टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध 36 धावांनी विजय, मालिकेत 1-1 ने केली बरोबरी)

या दुसर्‍या वनडे सामन्यात दोन्ही संघांनी बरेच उत्कृष्ट आणि मनोरंजक विक्रमं नोंदविली आहेत. जाणून घ्या:

1. ऑस्ट्रेलियाविरुद्ध हा भारताचा 51 वा विजय होता. यापूर्वी दोन्ही संघांमध्ये एकूण 138 सामने खेळले गेले होते. त्यापैकी ऑस्ट्रेलियाने 78, तर भारताने 50 सामने सामने जिंकले. शिवाय दोन्ही संघांमधील 10 सामने अनिश्चित राहिले.

2. संघाचा सर्वात वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्कची भारतीय फलंदाजांनी सर्वाधिक क्लास घेतली. राजकोट सामन्यात स्टार्कने भारतीय संघाविरूद्ध वनडेमध्ये सर्वाधिक धावा लुटवल्या. स्टार्कने आज 78 धावा दिल्या. तथापि, त्याने मॅनचेस्टरमध्ये 2015 मध्ये इंग्लंडविरुद्ध कारकिर्दीतील कोणत्याही वनडे सामन्यात सर्वाधिक धावा दिल्या. त्या सामन्यात स्टार्कने 10 षटकांत 79 धावा दिल्या होत्या.

3. विराट कोहलीने आज ऑस्ट्रेलियाविरुद्ध 4000 आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण केल्या आहेत. त्याने 86 डावांमध्ये 4000 धावा पूर्ण केल्या आहेत. सचिन तेंडुलकरने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वात जलद 4000 धावा केल्या आहेत. तेंडुलकरने 83 डावांमध्ये हा टप्पा गाठला आहे.

4. केएल राहुलने आज वनडे कारकीर्दीतील 1000 धावा पूर्ण केल्या आहेत. राहुलने भारताकडून तिसऱ्या सर्वात जलद एक हजार धावा केल्या. राहुलने 27 डावांमध्ये हा टप्पा पूर्ण केला.

5. विराट कोहलीला आज पाचव्यांदा वनडे क्रिकेटमध्ये अ‍ॅडम झांपाने बाद केले. वनडेमध्ये कोहली आणि झांपा 12 वेळा आमने-सामने आले असून झांपा कोहलीला 5 वेळा बाद करण्यात यशस्वी ठरला. वनडे सामन्यांमध्ये कोहलीला सर्वाधिक रवि रामपॉल (Ravi Rampaul) याने बाद केले आहे.

6. सलामी फलंदाज म्हणून आज रोहित शर्माने वनडे क्रिकेटमधील 7000 धावा पूर्ण केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या या स्वरूपात सलामी फलंदाज म्हणून वेगवान 7000 धावा करणारा रोहित जगातील पहिला फलंदाज बनला आहे.

7. वनडे सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 18 व्या वेळा 300 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाने 26 व्या वेळी भारताविरुद्ध 300 धावा केल्या.

8. कुलदीप यादवने आज वनडे कारकिर्दीतील 100 बळी पूर्ण केले आहेत. ही कामगिरी करणारा कुलदीप मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराहनंतर तिसरा जलद गोलंदाज ठरला. शमीने 56, बुमराहने 57, तर बुमराहने 58 डावांमध्ये हा टप्पा गाठला.

9. ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसर्‍या वनडे सामन्यात शिखर धवनने नर्व्हस नाईंटीचा शिकार बनला. या दशकात एकदिवसीय क्रिकेटमध्ये धवन भारतासाठी नर्व्हस नाईंटीचा शिकार बनणारा शिखर पहिला फलंदाज ठरला.

10. ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताच्या घरी खेळताना हा 28 वा विजय होता. यापूर्वी दोन्ही संघांमध्ये भारतीय भूमीवर एकूण 62 सामने खेळले गेले होते. त्यापैकी ऑस्ट्रेलियाने 30 सामने जिंकले होते. भारताने 27 सामने जिंकले, तर 5 सामने ड्रॉ राहिले.

दोन्ही संघ आता बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये तिसरा, निर्णायक सामना खेळतील. हा सामना रविवारी, 19 जानेवारीला खेळला जाईल. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंचने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. धवन, कर्णधार विराट आणि राहुलच्या तुफानी अर्धशतकी खेळीच्या जोरावर निर्धारित 50 षटकांत 6 विकेट्स गमावून टीम इंडियाने 340 धावा केल्या.



संबंधित बातम्या