IND vs AUS 2nd ODI: शिखर धवन, विराट कोहली, केएल राहुल यांचे अर्धशतक; टीम इंडियाचे ऑस्ट्रेलियाला 341 धावांचे आव्हान

अशामध्ये पहिले फलंदाजी करत भारताने निर्धारित 50 ओव्हरमध्ये 6 बाद 340 धावा केल्या आणि ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या सामन्यात 341 धावांचे लक्ष्य दिले. टीम इंडियाकडून धवन, कर्णधार विराट कोहली आणि केएल राहूल या तीन फलंदाजांनी अर्धशतकी कामगिरी केली.

शिखर धवन-विराट कोहली (Photo Credit: Getty)

भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यात राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर-सामन्यांच्या वनडे मालिकेचा दुसरा सामना खेळला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार आरोन फिंचने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. अशामध्ये पहिले फलंदाजी करत भारताने निर्धारित 50 ओव्हरमध्ये 6 बाद 340 धावा केल्या आणि ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या सामन्यात 341 धावांचे लक्ष्य दिले. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीनंतर रोहित शर्मा आणि शिखर धवन (Shikhar Dhawan) यांनी भारतीय संघासाठी डावाची चांगली सुरुवात केली. टीम इंडियाकडून धवन, कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि केएल राहूल (KL Rahul) या तीन फलंदाजांनी अर्धशतकी कामगिरी केली. धवनने सर्वाधिक 96, विराटने 78, तर राहुल 52 चेंडूत  80 धावा केल्या. कोहली बाद झाल्यावर रवींद्र जडेजाने राहुलला चांगली साठी दिली. दोंघांमध्ये अर्धशतकी भागीदारी झाली. टीम इंडियाकडून जडेजा आणि मोहम्मद शमी अनुंक्रमे 19 आणि 1 धावांवर नाबाद परतले.  ऑस्ट्रेलियाकडून अ‍ॅडम झांपा (Adam Zampa) याने पुन्हा एकदा चमकदार कामगिरी केली आणि सर्वाधिक 3 गडी बाद केले, तर केन रिचर्डसन (Kane Richardson) याने 2 विकेट घेतल्या. (IND vs AUS 2nd ODI: रोहित शर्मा याने नोंदवला विश्वविक्रम; सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि वीरेंद्र सेहवाग यांच्या वनडे एलिट यादीमध्ये सामील)

टॉस गमावून पहिले बॅटिंग करण्यासाठी आलेल्या रोहित आणि धवनने पहिल्या विकेटसाठी 81 धावांची भागीदारी केली, आणि रोहितला 42 धावांवर झांपाने एलबीडब्ल्यू आऊट करून यजमान संघाला पहिला धक्का दिला. धवनने सलग दुसर्‍या वनडे सामन्यात अर्धशतक ठोकले आणि दुसऱ्यांदा त्याचे शतक हुकले. यानंतर चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या श्रेयस अय्यरला काही खास करता आले नाही. अय्यर 7 धावा करुन झांपाचा शिकार बनला. मात्र, विराट क्रीजवर टिकून राहिला आणि त्याने 50 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. मात्र, त्याचेही शतक हुकले आणि 76 धावा काढून झांपाने त्याला मिशेल स्टार्ककडे कॅच आऊट केले. झांपाने सातव्यांदा विराटची विकेट घेतली आहे.

मुंबई वनडे सामन्यात पराभवाचा सामना केल्यानंतर भारतीय संघ राजकोट येथे ऑस्ट्रेलियावर पुन्हा एकदा विजयाच्या उद्देशाने खेळत आहे. 3 सामन्यांच्या मालिकेच्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने यजमान भारताला 10 गडी राखून पराभूत केले. टीम इंडिया सध्या मालिकेत 0-1 ने पिछाडीवर आहे. आजचा सामना जिंकून टीम इंडिया मालिकेत बरोबरी करण्याचा प्रयत्न करेल.