IPL Auction 2025 Live

IND vs AUS 2nd Boxing Day Test Day 1: भारतीय गोलंदाजांपुढे कांगारू संघाने टेकले गुडघे, ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 195 धावांवर गुंडाळला

टॉस जिंकून ऑस्ट्रेलियाकडून पहिले फलंदाजी करत मार्नस लाबूशेनने सर्वाधिक 48 धावा केल्या. दुसरीकडे,अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात भारतीय गोलंदाजांनी आक्रामक डावपेच वापरले आणि सुरुवातीपासून ऑस्ट्रेलियन फलंदाजांवर आपले वर्चस्व कायम ठेवले.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत 2nd टेस्ट, एमसीजी (Photo Credit: PTI)

IND vs AUS 2nd Boxing Day Test Day 1: मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर (Melbourne Cridket Ground) सुरु असलेल्या दुसऱ्या बॉक्सिंग डे टेस्ट (Boxing Day Test) मॅचच्या पहिल्या दिवशी यजमान ऑस्ट्रेलियाचा (Australia) पहिला डाव 195 धावांवर संपुष्टात आला. टॉस जिंकून ऑस्ट्रेलियाकडून पहिले फलंदाजी करत मार्नस लाबूशेनने (Marnus Labuschagne) सर्वाधिक 48 धावा केल्या तर ट्रेव्हिस हेडने 38 आणि मॅथ्यू वेडने 30 धावा केल्या. फिरकीपटू नॅथन लायनला 20 धावाच करता आल्या. अन्य फलंदाज दुहेरी धावसंख्या पार करू शकले नाही. दुसरीकडे, अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात भारतीय गोलंदाजांनी आक्रामक डावपेच वापरले आणि सुरुवातीपासून ऑस्ट्रेलियन फलंदाजांवर आपले वर्चस्व कायम ठेवले आणि एकाही फलंदाजाला मोठी खेळी करू दिली नाही. भारताकडून जसप्रीत बुमराहला 4, रविचंद्रन अश्विनला 3 तर पदार्पणवीर मोहम्मद शमी 2 आणि रवींद्र जडेजाला 1 विकेट मिळाली. (IND vs AUS 2nd Boxing Day Test: पदार्पणवीर शुभमन गिल-मोहम्मद सिराज यांची कमाल, 'या' घातक फलंदाजाला बाद करत ऑस्ट्रेलियाला दिला मोठा धक्का, पहा Video)

मेलबर्न टेस्टमध्ये नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाची चांगली सुरुवात झाली नाही. खराब फॉर्मशी झुंज देणाऱ्या बर्न्सला 10 चेंडूत शून्यावर बुमराहच्या विकेटच्या मागे रिषभ पंतकडे झेलबाद केलं. त्यानंतर अश्विनने कांगारू संघाला सलग दोन झटके दिले. स्टिव्ह स्मिथला शून्यावर कर्णधार रहाणेकडे तर 30 चेंडूंत 39 धावांवर खेळत मॅथ्यू वेडला रवींद्र जडेजाकडे कॅच आऊट केले. अश्विनने मालिकेत सलग दुसऱ्यांदा पॅव्हिलियनला पाठवलं. त्यानंतर लाबूशेन आणि हेडच्या अर्धशतकी भागीदारीने संघाचा डाव सावरला. बुमराहने ट्रॅव्हिस हेडला 38 धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर झेलबाद करून घातक ठरत असलेली भागीदारी मोडली. सिराजने नंतर लाबूशेनला शुभमनकडे कॅच आऊट करत पहिली आंतरराष्ट्रीय क्रिकेट मिळवली. कॅमरून ग्रीनच्या रूपात ऑस्ट्रेलियाला सहावा धक्का बसला. ग्रीन सिराजच्या चेंडूवर 12 धावांवर एलबीडब्ल्यू बाद झाला.

अश्विनने कांगारू संघाचा कर्णधार टिम पेनला 13 धावांवर मघई धाडलं आणि संघाला सातवे यश मिळवून दिले. मिचेल स्टार्कने 7 तर नॅथन लायन 20 धावा, पॅट कमिन्सने 9 आणि जोश हेझलवूड नाबाद 4 धावा करून परतला. दरम्यान, दुसऱ्या टेस्ट मॅचसाठी ऑस्ट्रेलियाने त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एकही बदल केला नसून भारताने चार बदल पाहायला मिळाले आहेत.