IND vs AUS 1st Test Day 3: ऑस्ट्रेलियाच्या वेगवान माऱ्याने भारताची उडवली भंबेरी, पिंक-बॉल टेस्ट मॅचमध्ये कांगारूपुढे 90 धावांचे लक्ष्य
अॅडिलेड ओव्हलमध्ये भारताने तिसऱ्या दिवशी 6/1 धावसंख्येपासून खेळण्यास सुरुवात केली, पण रात्रीच्या जेवणापर्यंत 39/9 धावांपर्यंतच मजल मारू शकले.
IND vs AUS 1st Test Day 3: भारत (India) आणि यजमान ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यातील पहिल्या पिंक-बॉल कसोटी (Pink Ball Test) सामन्याच्या तिसऱ्या दिवशी पॅट कमिन्स (Pat Cummins) आणि जोश हेझलवूड (Josh Hazlewood) यांच्या वेगवान माऱ्यापुढे भारतीय दिग्गज ढेर झाले आणि विजयासाठी कांगारू संघापुढे 90 धावांचे लक्ष्य ठेवले. विशेष म्हणजे टीम इंडियाची टेस्ट क्रिकेटमधील सर्वात छोटी धावसंख्या आहे. यापूर्वी इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्समध्ये 1974 मध्ये भारताने तिसऱ्या डावात अवघ्या 42 धावा केल्या होत्या. अॅडिलेड ओव्हलमध्ये भारताने तिसऱ्या दिवशी 6/1 धावसंख्येपासून खेळण्यास सुरुवात केली, पण अखेरीस 39/9 धावांपर्यंतच मजल मारू शकले. दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलिया संघाला पहिल्या डावात 191 धावांवर रोखल्यावर भारताने 53 धावांची आघाडी घेतली आणि दिसवासाखेर 62 धावांनी आघाडी वाढवली, मात्र तिसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीपुढे गुडघे टेकले आणि स्वस्तात माघारी परतले. भारताचा एकही फलंदाज दुहेरी धावसंख्या गाठू शकला नाही तर तीन शून्यावर माघारी परतले. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियासाठी कमिन्स 4 आणि हेझलवूडने सर्वाधिक 5 विकेट घेतल्या. (IND vs AUS 2020: कमालच! 2020 मध्ये विराट कोहलीची बॅट शांत, यंदा नाही ठोकू शकला एकही आंतरराष्ट्रीय शतक)
भारताच्या दुसऱ्या डावात मयंक अग्रवाल आणि हनुमा विहारीने प्रत्येकी 8 धावा केल्या, तर चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे आणि रविचंद्रन अश्विन दुसऱ्या डावात शून्यावर माघारी परतले. दिवसाच्या सुरुवातीला जसप्रीत बुमराह, पुजारा, रहाणे, मयंक आणि कोहलीला एकामागोमाग एक माघारी धाडत कांगारूंनी भारताला बॅकफूटला ढकललं आणि सामन्यात रंगात आणली. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी संघाला सामन्यात संघाला पुनरागमन करून दिलं. दरम्यान, आजवर खेळलेल्या सर्व 7 पिंक-बॉल कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला असून त्यांचे विजयीरथ रोखण्याचे कठीण आव्हान भारतीय संघापुढे आहे.
यापूर्वी भारताने टॉस जिंकून फलंदाजी करत पहिल्या डावात 244 धावा केल्या आणि ऑस्ट्रेलियाला त्यांच्या पहिल्या डावात 191 धावांवर रोखलं. कमिन्सचा चेंडूवर हाताला लागल्यानंतर मोहम्मद शमी दुखापतग्रस्त होऊन माघारी परतला आणि भारताने आपला दुसरा डाव 9 बाद 36 धावांवर घोषित केला.