IND vs ENG 1st Test Day 3: Bess-आर्चरपुढे भारताचे टॉप-ऑर्डर हतबल, Rishabh Pant ची 'हिटमॅन' स्टाईल फलंदाजी; Tea पर्यंत टीम इंडियाच्या 4 बाद 154 धावा
भारत आणि इंग्लंड संघातील एम. ए चिदंबरम स्टेडियमवर सुरू असलेल्या सामन्याच्या तिसऱ्या दिवसाच्या चहापानपर्यंत भारतीय संघाने पहिल्या डावात 4 विकेट गमावून 154 धावा केल्या आहेत. रिषभ पंत नाबाद 54 धावा आणि चेतेश्वर पुजारा नाबाद 53 धावा करून खेळत आहेत. पाहुण्या संघाने पहिल्या डावात केलेल्या 578 धावांच्या प्रत्युत्तरात टीम इंडिया अद्याप 424 धावांनी पिछाडीवर आहे.
IND vs AUS 1st Test Day 3: भारत (India) आणि इंग्लंड (England) संघातील एम. ए चिदंबरम स्टेडियमवर (MA Chidambaram Stadium) सुरू असलेल्या सामन्याच्या तिसऱ्या दिवसाच्या चहापानपर्यंत भारतीय संघाने (Indian Team) पहिल्या डावात 4 विकेट गमावून 154 धावा केल्या आहेत. रिषभ पंत (Rishabh Pant) नाबाद 54 धावा आणि चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) नाबाद 53 धावा करून खेळत आहेत. पाहुण्या संघाने पहिल्या डावात केलेल्या 578 धावांच्या प्रत्युत्तरात टीम इंडिया अद्याप 424 धावांनी पिछाडीवर आहे. पंत आणि पुजारा यांच्यात पाचव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी संघाच्या आशा पल्लवित ठेवल्या आहेत. तिसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात भारताने सलामी जोडीपाठोपाठ कर्णधार विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेचीही विकेट लवकर गमावली. इंग्लंडकडून डोम बेस (Dom Bess) आणि जोफ्रा आर्चर (Jofra Archer) यांनी प्रत्येकी 2 विकेट घेत यजमान टीम इंडियाला अडचणीत पडले होते. मात्र, पुजारा आणि पंतने आक्रमक फलंदाजी करत संघाचा डाव सावरला. (IND vs ENG 1st Test Day 3: जो रूटची द्विशतकी खेळी, भारतीय गोलंदाज हतबल; इंग्लंडचा पहिला डाव 578 धावांवर संपुष्टात)
दुसऱ्या सत्रात विराट आणि पुजाराने चांगली सुरुवात केली असताना फिरकीपटू बेसने टीम इंडिया कर्णधाराला फिरकीत अडकवले. भारतीय डावाच्या 25व्या ओव्हर बेसने टाकलेला चेंडू विराटच्या बॅटच्या कडेला लागून तिथे उभ्या असलेल्या ओली पोपकडे गेला ज्याने चूक न करता झेल पकडला. त्यामुळे, विराट 48 चेंडूत 11 धावा करून माघारी परतला. कोहलीनंतर उपकर्णधार अजिंक्य राहणेनेही पुजार्याला अधिक काळ साथ देऊ शकला नाही आणि आर्चरने 1 धाववर बेसने झेलबाद केले. यानंतर पंतने आक्रमक भूमिका घेत पुजाराला चांगली साथ दिली. भारताने 100 धावांच्या आता 4 विकेट गमावल्यावर पंत-पुजाराच्या अर्धशतकी भागीदारीने संघाची धावसंख्या दीडशे पार नेली. एका बाजूने पुजारा सावध खेळ करत असताना पंतने आक्रमक फलंदाजी केली. त्याने इंग्लंडच्या बेस आणि जॅक लीच या फिरकीपटूंच्या गोलंदाजीवर आक्रमक पवित्रा घेतला. त्याने 32व्या ओव्हरमध्ये लीचच्या गोलंदाजीवर सलग 2 षटकार मारले. त्यानंतर त्याने 34व्या आणि 36व्या ओव्हरमधेही लीचच्या गोलंदाजीवर षटकार खेचले. पंत आणि पुजाराने भारताचा डाव सांभाळताना वैयक्तिक अर्धशतकी धावसंख्याही पार केली.
यापूर्वी, टीम इंडियासाठी पहिल्या डावात सलामी जोडी अपयशी ठरली. रोहित शर्माच्या रुपात संघाला पहिला धक्का बसला. रोहित 6 धाव करून माघारी परतला. रोहितपाठोपाठ शुभमन गिलही 29 धावांवर पॅव्हिलियनमध्ये परतला.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)