IND vs AUS 1st Test 2020: टीम इंडिया कंबर कसून तयार, पहिल्या टेस्ट मॅचपूर्वी नेट्समध्ये गाळला घाम (Watch Video)
सध्या सुरू असलेल्या डाऊन अंडर दौर्यामध्ये भारताच्या प्रशिक्षण सत्रातील काही स्निपेट्स शेअर करताना भारतीय क्रिकेट टीमच्या अधिकृत हँडलने काही संक्षिप्त व्हिडिओ पोस्ट केले.
IND vs AUS 1st Test 2020: ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) टी-20 मध्ये वनडे मालिकेतील पराभवाचा बदला घेतल्यानंतर विराट कोहली नेतृत्वात टीम इंडिया (Team India) आता यजमान ऑस्ट्रेलियाविरुद्ध आगामी चार सामन्यांच्या कसोटी सामन्यात 2018-19 च्या हंगामातील ऐतिहासिक बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या (Border-Gavaskar Trophy) विजयाची पुनरावृत्ती करण्याच्या प्रयत्नात असेल. हाय-प्रोफाइल टीममधील कसोटी मालिकेपूर्वी कोहली आणि कंपनीने ऑस्ट्रेलियामध्ये पहिल्या गुलाबी-बॉल कसोटी (Pink-Ball Test) सामन्याआधी नेटमध्ये कंबर कसून तयारी करताना दिसली. दिवस/रात्र कसोटी सामने खेळण्याचा भारतीय संघाकडे (Indian Team) फारसा अनुभव नाही, ज्यामुळे कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार अजिंक्य रहाणे आणि 'टेस्ट स्पेशलिस्ट' चेतेश्वर पुजारा यांनी नेटमध्ये जोरदार फलंदाजी केली. सध्या सुरू असलेल्या डाऊन अंडर दौर्यामध्ये भारताच्या प्रशिक्षण सत्रातील काही स्निपेट्स शेअर करताना भारतीय क्रिकेट टीमच्या अधिकृत हँडलने काही संक्षिप्त व्हिडिओ पोस्ट केले. (IND vs AUS Test 2020-21 Stats: टीम इंडियासाठी धोक्याची घंटा, पिंक-बॉल टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाचा बोलबाला; पाहा कोण आहे सर्वोच्च वैयक्तिक धावा, विकेट्स घेणारे खेळाडू)
हनुमा विहारी आणि रिषभ पंत यांनी गुलाबी चेंडूने सराव सामन्यात शतकी कामगिरी केली. त्याचबरोबर, अॅडिलेड कसोटी सामन्यात टीम इंडियाचे आघाडीचे फलंदाज गुलाबी बॉलचा सामना करतात हे पाहणे खूप रंजक ठरेल. भारतीय संघाने मागील वर्षी बांग्लादेशविरुद्ध एकमेव पिंक-बॉल टेस्ट मॅच खेळली आहे तर ऑस्ट्रेलिया पिंक-बॉल टेस्टमधील सर्वात यशस्वी टीम आहे. त्यांनी आजवर सहा दिवस/रात्र सामने खेळले असून सर्वांमध्ये ते अजेय राहिले आहेत. विशेष म्हणजे हे सर्व सामने त्यांनी घरच्या मैदानावर (अॅडिलेडमध्ये 4 आणि ब्रिस्बेनमध्ये 2) खेळले आहेत. पाहा भारतीय संघाचा नेट सत्र:
टीम इंडिया
मेजदार ड्रिल
दरम्यान, गुलाबी बॉल टेस्ट कर्णधार कोहलीचा सध्या सुरू असलेल्या डाऊन अंडरमध्ये टीम इंडियाचा अंतिम सामना असेल. आपल्या पहिल्या मुलाच्या जन्मासाठी टीम पेनच्या नेतृत्वात कांगारू संघाविरुद्ध दिवस/रात्र कसोटी मॅचनंतर विराट मायदेशी परतणार आहे. विराटच्या अनुपस्थितीत उपकर्णधार रहाणेवर संघाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी असेल. अॅडिलेड कसोटी सामन्यापूर्वी रहाणेने एक निवेदन देऊन सांगितले की, भारतीय प्लेइंग इलेव्हनमध्ये आम्हाला ईशांत शर्माची उणीव नक्कीच जाणवेल. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आगामी कसोटी मालिकेविषयी बोलायचे तर बहुचर्चित पहिला सामना गुरुवारी प्रसिद्ध अॅडिलेड ओव्हल आयोजित केला जाणार आहे.