IND vs AUS 1st ODI: आरोन फिंच याने जिंकला टॉस, भारताची पहिले बॅटिंग; असा आहे टीम इंडिया-ऑस्ट्रेलियाचा प्लेयिंग इलेव्हन
मुंबईच्या सामन्यात टॉस जिंकून ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंच याने टॉस जिंकला आणि पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) संघातील 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये (Wankhede Stadium) थोड्याच वेळात सुरु होईल. दोन्ही संघ जगातील सर्वोत्तम संघ असून वानखेडे येथील क्रिकेट चाहत्यांना मंगळवारी एक शानदार सामना पाहायला मिळणार आहे.मुंबईच्या सामन्यात टॉस जिंकून ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंच (Aaron Finch) याने टॉस जिंकला आणि पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिका, बांग्लादेश, वेस्ट इंडीज आणि श्रीलंका यासारख्या देशांविरुद्ध घरच्या मैदानावर खेळत मालिका जिंकल्यावर आता टीम इंडियासमोर एक मोठे आव्हान आहे. भारताच्या प्लेयिंग इलेव्हनमध्ये रोहित शर्मा, शिखर धवन आणि केएल राहुल यांना स्थान देण्यात आले आहे. याचा अर्ध कि राहुलला तिसऱ्या स्थानावर फलंदाजीसाठी पाठवत विराट स्वतः खालच्या क्रमांकावर बॅटिंगसाठी उतरेल. मागील वर्षी भारताला त्यांच्याच मैदानावर वनडे मालिकेत पराभूत केल्याने ऑस्ट्रेलिया संघ पुन्हा एकदा तश्याच कामगिरीच्या पुनरावृत्ती करण्यासाठी उत्सुक असेल. (IND vs AUS 1st ODI: विराट कोहली याने नेट्समध्ये जसप्रीत बुमराह याला सामोरे जाण्याचा शेअर केला मजेदार अनुभव, पाहा Video)
दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाने देखील मजबूत प्लेयिंग इलेव्हन निवडला आहे. डेविड वॉर्नर आणि स्टिव्ह स्मिथ यांच्या पुनरागमनानंतर कांगारू संघ अजून मजबूत झाले आहे. शिवाय, मार्नस लाबूशेन याला टेस्टनंतर वनडेमध्ये पदार्पणाची संधी मिळाली आहे. विराट सेनेला वनडेमध्ये पराभूत करणारा ऑस्ट्रेलिया हा एकमात्र संघ आहे. ऑस्ट्रेलिया त्यांच्या वेगवान गोलंदाजांवर अवलंबून आहे. पॅट कमिन्स, मिशेल स्टार्क आणि केन रिचर्डसन यांच्यासारख्या अनुभवी गोलंदाजांचा ऑस्ट्रेलियाने प्लेयिंग इलेव्हनमध्ये समावेश केला आहे, जे विराट सेनेला त्रास देण्यासाठी कोणतीही कसर सोडणार नाही.
असा आहे भारत-ऑस्ट्रेलियाचा प्लेयिंग इलेव्हन
भारत: विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा, शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, रिषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव आणि शार्दूल ठाकूर, .
ऑस्ट्रेलिया: आरोन फिंच (कॅप्टन), डेविड वॉर्नर, स्टिव्ह स्मिथ, मार्नस लाबूशेन, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), अॅश्टन टर्नर, पॅट कमिन्स, मिशेल स्टार्क, केन रिचर्डसन, अॅडम झँपा, अॅस्टन अगार.