IND vs AFG, ICC World Cup 2019: अफगाण फिरकी समोर भारत निरुत्तर, भारताने केल्या 224 धावा

साउथॅंप्टन येथे खेळल्या जात असलेल्या भारत (India) विरुद्ध अफगाणिस्तान (Afghanistan) सामन्यात भारतीय फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी करत अफगाणिस्तान समोर जिंकण्यासाठी 225 धावांचे आव्हान ठेवले आहे.

साउथॅंप्टन येथे खेळल्या जात असलेल्या भारत (India) विरुद्ध अफगाणिस्तान (Afghanistan) सामन्यात भारतीय फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली आहे. टॉस जिंकून पहिले फलंदाजी करत, भारतीय संघाने अफगाणिस्तान समोर जिंकण्यासाठी 225 धावांचे आव्हान ठेवले आहे. अफगाणिस्तानच्या फिरकी गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाजांना आक्रमक फलंदाजी करता आली नाही. भारताला पहिला झटका रोहित शर्मा (Rohit Sharma) च्या रूपात लागला. रोहित ने 10 चेंडूत 1 धावा केल्या. त्यानंतर लगेचच के एल राहुल (KL Rahul) 30 धावांवर बाद झाला. विराट आणि राहुल यांच्यात अर्धशतकी भागिदारी झाली. विराट कोहली (Virat Kohli) नं 48 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले.

राहुल बाद होताच, विराट ने विजय शंकर (Vijay Shankar) सह अर्धशतकी भागिदारी रचली. त्यानंतर विजय शंकर 30 धावांवर बाद झाला, विराट कोहली 67 धावांवर बाद झाला. धोनी (MS Dhoni) ही जास्त काही करू शकला नाही आणि 28 धावांवर बाद झाला.

यंदाच्या विश्वकपमध्ये भारत पराजित राहत गुणतक्त्यात पहिल्या चारमध्ये आपले स्थान कायम राखलं आहे. तर, अफगाणिस्ताननं आतापर्यंत एकही सामना जिंकलेला नाही आणि त्यामुळे त्यांचे आव्हान विश्वकपमध्ये संपुष्टात आले आहे.