IND-A vs AUS-A Tour Match: भारत-ऑस्ट्रेलिया ‘अ’ D/N सराव सामना अनिर्णित, चार खेळाडूंची शतकी खेळी

सिडनी क्रिकेट ग्राउंडवर झालेल्या सराव सामन्यात दोन्ही संघातील प्रत्येकी 2 अशा एकूण चार फलंदाजांनी शतकी खेळी केली. ऑस्ट्रेलियासाठी दुसऱ्या डावात बेन मॅकडर्मोट नाबाद 107 धावा आणि जॅक वाइल्डरमुथ नाबाद 111 धावा करून परतले.

भारत-ऑस्ट्रेलिया ‘अ’ D/N सराव सामना (Photo Credit: Getty Images Australia)

IND-A vs AUS-A Tour Match: भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया-अ (Australia-A) संघातील दुसरा सराव सामना अनिर्णित राहिला. सिडनी क्रिकेट ग्राउंडवर (Sydney Cricket Ground) झालेल्या सराव सामन्यात दोन्ही संघातील प्रत्येकी 2 अशा एकूण चार फलंदाजांनी शतकी खेळी केली. ऑस्ट्रेलियासाठी दुसऱ्या डावात बेन मॅकडर्मोट (Ben McDermott) नाबाद 107 धावा आणि जॅक वाइल्डरमुथ (Jack Wildermuth) नाबाद 111 धावा करून परतले. पहिल्या डावात बॅटने फ्लॉप झाल्यावर शुभमन गिल, मयंक अग्रवाल यांनी अर्धशतक ठोकले, तर हनुमा विहारी (Hanuma Vihari) आणि रिषभ पंत (Rishabh Pant) दुसऱ्या दिवशी शतकी खेळीनंतर नाबाद परतले. विहारीने नाबाद 104 तर पंतने नाबाद 103 धावा केल्या. टॉस जिंकून भारतीय कर्णधार अजिंक्य रहाणेने फलंदाजीचा निर्णय घेतलं, पण एकेवेळी 123-9 अशी धावसंख्या असताना जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) जबरदस्त अर्धशतक ठोकत संघात 194 धावांपर्यंत मजल मारून दिली. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलिया 108 धावांवर ऑलआऊट झाला आणि भारताने 86 धावांची आघाडी घेतली. भारतीय गोलंदाजांपुढे ऑस्ट्रेलियन फलंदाज ढेर झाले, तर संघातील चार गोलंदाज भोपळाही फोडू शकले नाही. (IND-A vs AUS-A 2nd Practice Match: ब्रॅड हॉग यांनी भारताच्या टॉप ऑर्डरवर साधला निशाणा, वसीम जाफरने प्रतिक्रिया देत केली बोलती बंद)

अशा प्रकारे पहिल्या दिवशी दोन्ही संघाचे मिळून एकूण 20 विकेट पडल्या. मात्र, दुसऱ्या डावात भारताने दमदार पुनरागमन केलं आणि ऑस्ट्रेलिया-अ संघाला बॅकफूटवर ढकललं. दुसऱ्या दिवसाखेर भारताने 386-4 धावांवर डाव घोषित केला आणि ऑस्ट्रेलियापुढे 473 धावांचं तगडं आव्हान दिलं. जो बर्न्स पुहा एकदा प्रभावी खेळी करण्यात अपयशी ठरला आणि मोहम्मद शमीच्या चेंडूवर स्वस्तात माघारी परतला. मार्कस हॅरिस देखील 5 धावाच करू शकला. निक मॅडिनसन 14 धावा केल्या. मात्र नंतर कर्णधार अ‍ॅलेक्स कॅरी आणि बेन मॅकडर्मोट यांनी शतकी खेळी करत संघाचा डाव सावरला. या दरम्यान कॅरीने अर्धशतक ठोकले, पण विहारीच्या चेंडूवर कुलदीप यादवकडे 58 धावांवर असताना झेलबाद होऊन माघारी परतला. भारताकडून शमीने 2 तर बुमराहला 1 विकेट मिळाली.

यजमान ऑस्ट्रेलिया आणि भारतीय संघात 17 डिसेंबरपासून चार सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होईल. पहिला सामना दिवस/रात्र खेळला जाणार असून अ‍ॅडिलेडमध्ये आयोजित केला जाणार आहे. भारत-ऑस्ट्रेलिया पहिल्यांदा पिंक-बॉल कसोटी सामन्यात आमने-सामने येतील.