ICC WTC Final: जसप्रीत बुमराह-शमी सोबत टेस्ट चॅम्पियनशिप फायनल कोण असेल भारताचा तिसरा वेगवान गोलंदाज, Sanjay Manjrekar ने ‘या’ मुंबईकरची केली निवड

भारताचे माजी फलंदाज संजय मांजरेकर यांनी पुढील महिन्यात न्यूझीलंडविरुद्ध आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल सामन्यात जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमीनंतर तिसरा वेगवान गोलंदाज म्हणून शार्दुल ठाकूरची निवड केली आहे. मोहम्मद सिराज आणि इशांत शर्मापेक्षा बॉल स्विंग करता येत असल्याने ठाकूर अधिक उपयुक्त ठरेल असे मत मांजरेकरांनी व्यक्त केले.

संजय मांजरेकर (Photo Credits: Instagram)

ICC WTC Final: भारताचे माजी फलंदाज संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांनी पुढील महिन्यात न्यूझीलंडविरुद्ध (New Zealand) आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल (ICC World Test Championship Final) सामन्यात जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमीनंतर तिसरा वेगवान गोलंदाज म्हणून शार्दुल ठाकूरची (Shardul Thakur) निवड केली आहे. इंग्लंडच्या उन्हाळ्याच्या उत्तरार्धात मोहम्मद सिराज आणि इशांत शर्मापेक्षा बॉल स्विंग करता येत असल्याने ठाकूर अधिक उपयुक्त ठरेल असे मत मांजरेकरांनी व्यक्त केले. “वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) फायनलमध्ये इंग्लिश उन्हाळ्याच्या पहिल्या सहामाहीत जेव्हा न्यूझीलंडविरुद्ध भारत खेळेल, तेव्हा मी शार्दुल ठाकूर - स्विंग गोलंदाज म्हणून पसंत करेल - जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि मोहम्मद शमी (Mohammed Shami) यांच्यासोबत तिसरा वेगवान गोलंदाज असेल,” मांजरेकर यांनी ESPNcricinfo.com ला सांगितले. यापूर्वी गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुणने अष्टपैलू हार्दिक पांड्याची जागा भरण्यासाठी शार्दूल ठाकूरला पाठिंबा दर्शवला होता. (Hardik Pandya's Replacement: हार्दिक पांड्याला झटका; धोनीच्या टीमचा हा स्टार बनणार टीम इंडियाचा पुढील अष्टपैलू, प्रशिक्षकाने केले समर्थन)

“जेव्हा भारत न्यूझीलंडमध्ये होता तेव्हा भारताने चुकवलेल्या गोष्टींपैकी एक योग्य स्विंग गोलंदाज होता. भारतीयांनी चांगली फलंदाजी केली नाही परंतु न्यूझीलंडच्या जिंकण्यामागे एक कारण  म्हणजे त्यांच्याकडे न्युझीलंडच्या परिस्थितीचा गैरफायदा घेऊ शकणारे योग्य स्विंग गोलंदाज होते,” मांजरेकर यांनी पुढे म्हटले. मांजरेकर यांनी ठाकूरसाठी इंग्लंडमधील परिस्थिती उपयुक्त ठरण्यामागील कारण स्पष्ट केले. “आता इंग्रजी उन्हाळ्याच्या पहिल्या सहामाहीत सूर्य इतका बाहेर येत नाही. न्यूझीलंडमध्ये असलेल्या परिस्थितीप्रमाणेच स्थिती निर्माण होईल,” असेही ते पुढे म्हणाले. इंग्लंड दौर्‍यासाठी जेव्हा टीम इंडियाची घोषणा केली गेली तेव्हा हार्दिकला या संघात स्थान का नाही मिळालं याबद्दल अनेक क्रिकेट तज्ञ आणि चाहत्यांनी आश्चर्य व्यक्त केले. यानंतर बुधवारी टीम इंडियाचे गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांनी चित्र स्पष्ट केले. भरत अरुण म्हणाले की अष्टपैलू होण्यासाठी शार्दुल ठाकूरची ताकद आहे, त्याने हे सिद्ध केले आहे. दुखापती झाल्यापासून भारतीय संघ हार्दिकचा पर्याय शोधत आहे.

पीटीआयशी बोलताना अरुण यांनी सांगितले की पुढील पर्यायांचा शोध घेण्याबाबत निवडकर्त्यांचा निर्णय असेल तर ठाकूरने योग्य पर्याय म्हणून उपलब्द केले आहे. 2018 इंग्लंड दौऱ्यावर अखेर खेळलेल्या हार्दिकवर 2019 मध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली होती ज्यांनंतर तो भारतीय संघच नव्हे तर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्ससाठी देखील अद्याप नियमितपणे गोलंदाजी करत नाही आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now