IND vs NZ ICC WTC Final 2021: विराट कोहली विरोधात पंचांच्या रिव्यूमुळे उडाला गोंधळ, जाणून घ्या काय आहे पूर्ण प्रकरण

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरु असलेला आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल सामन्याच्या दुसर्‍या दिवशी विराट कोहली बाद होता होता वाचला होता. चेंडू त्याच्या बॅटची कड घेऊन यष्टीरक्षकाकडे गेल्या असल्याने झेलबादसाठी न्यूझीलंडने अपील केले होते. मात्र, पंचांनी घेतलेल्या रिव्ह्यूमध्ये तो नाबाद असल्याचे दिसले.

विराट कोहलीने अंपायरना विचारले जाब (Photo Credit: PTI)

ICC WTC Final 2021: भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यात सुरु असलेला आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) फायनल सामन्याच्या दुसर्‍या दिवशी लंचनंतर एका पंचची चूक भारतीय संघाला भारी पडली असती पण नशिबाने भारतीय संघाची  (Indian Team) साथ दिली आणि त्यांना त्रास सहन करावा लागला नाही. डावाच्या 41व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर ही रोचक घटना घडली. ट्रेंट बोल्ट (Trent Boult) त्याच षटकात चेतेश्वर पुजाराची विकेट घेतल्यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) गोलंदाजी करत होता. कोहलीविरुद्ध शेवटचा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर जात होता आणि विराटला तो खेळायचा होता पण बॉल विकेटकीपर बीजे वॅटलिंगच्या हातात येताच बोल्टने पंचांना अपील केले. अशा परिस्थितीत किवी खेळाडूंमध्ये रिव्यू घेण्याबाबत सल्लामसलत होत होती आणि निर्धारित वेळही संपला परंतु पंच रिचर्ड एलिंगवर्थने स्वत: मदतीसाठी थर्ड अंपायरला गाठले. (IND vs NZ ICC WTC Final 2021: साउथॅम्प्टनमध्ये Virat Kohli याची बॅट तळपली तर तर एक किंवा दोन नव्हे तर 6 दिग्गज खेळाडूंचे मोडणार वर्ल्ड रेकॉर्ड)

मैदानावरील अंपायरच्या या निर्णयामुळे स्वतः विराट आणि चाहत्यांमध्ये गोंधळ उडाला कारण किवी कर्णधार केन विल्यमसनने रिव्यू घेतलाच नव्हता तर फिल्ड अंपायर मदतीसाठी थर्ड अंपायरकडे का गेले? तथापि, पंचांची ही चूक किवी संघासाठी फायदेशीर ठरली, कारण किवीच्या खेळाडूंना खात्री होती की चेंडू विराटच्या बॅटला लागला आणि विकेटकीपरकडे गेला. अशा प्रकारे त्यांचा एक रिव्यू वाचला. विराट कोहलीने देखील पंचांकडे जाऊन जाब विचारला. मात्र, पंचांनी घेतलेल्या रिव्ह्यूमध्ये तो नाबाद असल्याचे दिसले. सर्वांना वाटत होते की विकेटकीपरने बॉल बरोबर पकडला आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी पंच थर्ड अंपायरकडे गेले परंतु थर्ड अंपायरने अल्ट्राएजच्या सहाय्याने निर्णय घेतला. पण वास्तविकता अशी आहे की 1 एप्रिल, 2021 रोजी आयसीसीने बदलेल्या नियमानुसार, बॉलचा बॅटशी संपर्क झाला आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी फील्ड अंपायर  थर्ड अंपायरची मदत घेऊ शकतात. जो पर्यंत ही माहिती चाहत्यांपर्यंत पोहचली तोपर्यंत सोशल मीडियावर हंगाम झाला होता.

पाहा काय सांगतो ICC चा नियम

दरम्यान, दिवसाच्या दुसर्‍या सत्रात भारताने पुजाराच्या रूपात आणखी एक विकेट गमावली आणि सध्या कोहली उपकर्णधार अजिंक्य रहाणेसह फलंदाजी करत आहे. भारताने दुसऱ्या सत्रापर्यंत 119 धावांवर 3 विकेट्स गमावल्या आहेत.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now