ICC WTC Final 2021: फायनल सामन्यात टीम इंडियाची करणार जोरदार कमबॅक, भारतीय दिग्गजाने दिला विराटसेनेला पाठिंबा तर यूजर्स म्हणाले- 'बारीश तो रुक जाए'

गोलंदाजाने केलेल्या ट्विटची दखल घेत भारतीय संघाच्या चाहत्यांनी त्याच्या अलीकडील पोस्टवर अनेक मजेदार टिप्पण्या केल्या.

विराट कोहली आणि केन विल्यमसन (Photo Credit: PTI)

ICC WTC Final 2021: अनुभवी भारतीय फिरकीपटू आणि कोलकाता नाईट रायडर्सचा (केकेआर) सुपरस्टार हरभजन सिंहने (Harbhajan Singh) विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडियाला (Team India) सध्या सुरू असलेल्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship_ फायनलच्या चौथ्या दिवशी शानदार कामगिरी करून सामन्यात पुनरागमन करण्यासाठी पाठिंबा दर्शविला आहे. सर्वात जुने आणि प्रदीर्घ स्वरूपात टीम इंडियासाठी (Team India) सर्वात यशस्वी फिरकीपटूंपैकी एक, हरभजनने साऊथॅम्प्टन (Southampton) येथे केन विल्यमसनच्या न्यूझीलंड (New Zealand) विरुद्ध कसोटी अजिंक्यपदाच्या तिसर्‍या दिवशी कोहलीच्या संघासाठी 'खराब दिवस' असल्याचे म्हटले. कसोटी चॅम्पियनशिप फायनलच्या दिवसाच्या कामकाजावर बारकाईने लक्ष ठेवून हरभजनने ट्विटरवर साऊथॅम्प्टन येथे चौथा दिवस सुरू होण्यापूर्वी विराटसेनेला पाठिंबा दर्शविला. (IND vs NZ WTC Final 2021: हॅम्पशायर बाऊलच्या मैदानात पावसाची जोरदार बॅटिंग, चौथ्या दिवसाचा खेळ रद्द)

"मैदानावर टीम इंडियाचा काल चांगला दिवस नव्हता. चांगली गोष्ट ते आता भूतकाळ आहे..सर्व 3 सत्रे जिंकण्यासाठी टीम इंडियाला त्यांच्या सर्वतोपरीने खेळण्यासाठी पूर्ण पाठिंबा. हे शक्य आहे, करून दाखवा मुलांनो," हरभजनने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, अनुभवी फिरकी गोलंदाजाने केलेल्या ट्विटची दखल घेत भारतीय संघाच्या चाहत्यांनी त्याच्या अलीकडील पोस्टवर अनेक मजेदार टिप्पण्या केल्या. चौथ्या दिवसाच्या खेळाला विलंब झाल्यामुळे चाहते निराश झालेले दिसले. सोमवारी 4 व्या दिवसाच्या पहिल्या सत्रावर पावसाने पाणी फेरल्यावर चाहत्यांनी आपली निराशा व्यक्त केली.

आपण हवामान अंदाज पाहिला?

पाऊसच विजेता... 

बारीश तो रुक जाए पाजी!

वॉश आउट

आज पावसाचा दिवस आहे

न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज काईल जेमीसनने तिसऱ्या दिवशी कोहलीच्या नेतृत्वातील फलंदाजी क्रमवार त्याच्या प्रभावी वेगवान गोलंदाजीच्या जोरदार हल्ला चढवला. इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचे (आरसीबी) प्रतिनिधित्व करणाऱ्या जेम्ससनला आदल्या दिवशीच्या पहिल्या सत्रात टीम इंडियाचा कर्णधार विराटची जॅकपॉट विकेट मिळाली. किवी गोलंदाजाने पाच विकेट घेत भारतीय संघाला पहिल्या डावात 217 धावांवर गुंडाळलं. प्रत्युत्तरात ईशांत शर्मा आणि रविचंद्रन अश्विन यांनी डेव्हन कॉनवे व टॉम लाथमची महत्त्वपूर्ण विकेट मिळवली. तिसऱ्या दिवसाखेर किवी संघाची स्थिती 101-2 अशी होती.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif