ICC World Cup 2019: एम एस धोनीला न्यूझीलंड विरुद्ध सेमीफाइनलमध्ये 7 व्या क्रमांकावर का पाठविले? वाचा रवि शास्त्री यांचे स्पष्टीकरण
न्यूझीलंड विरुद्ध सेमीफायनल सामन्यात महेंद्र सिंह धोनी याला सातव्या क्रमांकावर खेळवण्याच्या निर्णयावर टीका होत आहे.असे असतानाच एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत टीम इंडियाचे कोच रवी शास्त्री यांनी अखेर धोनीच्या उशिरा फलंदाजीला येण्याविषयी मौन सोडलं आहे.
इंग्लंडमध्ये आयोजित आयसीसी (ICC) क्रिकेट विश्वचषकच्या न्यूझीलंड (New Zealand) विरुद्ध सेमीफायनल सामन्यात महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) याला सातव्या क्रमांकावर खेळवण्याच्या निर्णयावर टीका होत आहे. भारतीय संघ मुश्किलमध्ये असताना धोनीच्या जागी पाचव्या क्रमांकावर दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) याला पाठवले असल्यामुळे चाहत्यांमध्ये नाराजी आहे. न्यूझीलंडविरुद्ध निर्णायक सामन्यात भारताची आघाडीची फळी प्रत्येकी 1 धाव करत बाद जाळी आणि मधल्या फळीने देखील शोभेल अशी कामगिरी केली नाही. मात्र, धोनी आणि रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) यांनी भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला पण संघाला विजय मिळवून देण्यात त्यांना यास मिळाले नाही. (क्रिकेटमधून निवृत्तीनंतर महेंद्र सिंघ धोनी भाजपमध्ये प्रवेश करणार? पहा काय म्हणाले जेष्ठ भाजप नेते)
दरम्यान, असे असतानाच एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत टीम इंडियाचे कोच रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी अखेर धोनीच्या उशिरा फलंदाजीला येण्याविषयी मौन सोडलं आहे. याबाबत स्पष्टीकरण देताना शास्त्री म्हणाले, "धोनीला सातव्या क्रमांकावर खेळवण्याचा निर्णय संपूर्ण संघाचाच होता." पुठे सवाल विचारात शास्त्री म्हणाले, "सर्व खेळाडूंचं यावर एकमत होतं. विशेष म्हणजे हा काही मोठा निर्णय नव्हता. हा साधारण निर्णय होता. दुसरं असं की धोनी वरच्या क्रमांकावर खेळायला यावा आणि लवकर बाद व्हावा असं तुम्हाला वाटतं का?.
न्यूझीलंडविरुद्ध सेमीफायनलमध्ये टीम इंडियाला फक्त 18 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. विश्वचषकाच्या आपल्या अंतिम सामन्यात धोनीने 50 धावा केल्या होत्या, पण दोन धावा घेण्याच्या नादात तो धावचीत झाला आणि भारताची जिंकण्याची सर्व आशा मावळली.