ICC World Cup 2019: इंग्लंडचा 64 धावांनी पराभव करत, ऑस्ट्रेलिया संघाचा सेमीफायनलमध्ये प्रवेश

ऑस्ट्रेलियापेक्षा इंग्लंडसाठी हा सामना फार महत्वाचा आहे, कारण श्रीलंकेकडून 20 धावांनी पराभूत झाल्यामुळे इंग्लंडच्या आव्हानाला धक्का बसला आहे

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघ Photo Credits: File Photo)

विश्वचषक स्पर्धेतील (ICC Cricket World Cup 2019) 32 वा आणि एक महत्वाचा सामना आज पार पडला. लंडन येथील लाॅर्डस मैदानावर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया (Australia vs England) एकमेकांच्या समोर उभे ठाकले होते. ऑस्ट्रेलियापेक्षा इंग्लंडसाठी हा सामना फार महत्वाचा होता, कारण श्रीलंकेकडून 20 धावांनी पराभूत झाल्यामुळे इंग्लंडच्या आव्हानाला धक्का बसला होता. इंग्लंडने टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला, त्यावर ऑस्ट्रेलियाने फलंदाजी करत 7 विकेट्सवर 285 धावांचा टप्पा पार केला. ऑस्ट्रेलियाच्या फिंच आणि  वॉर्नर या खेळाडूंनी अतिशय चांगली कामगिरी करत इंग्लंडसमोर तगडे आव्हान उभे केले होते. मात्र इंग्लंड हे आव्हान पेलू शकला नाही.

अखेर इंग्लंडचा 64 धावांनी पराभव करत ऑस्ट्रेलिया उपांत्यफेरीमध्ये पोहचला आहे. इंग्लंडला सेमिफायनलमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी हा सामना अतिशय महत्वाचा समजला जात होता. मात्र आता शेवटची अशाही मावळली आहे. इंग्लंडकडून बेन स्टोक्स वगळता एकही फलंदाज ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांसमोर टिकला नाही. ऑस्ट्रेलियाने समोर ठेवलेले 286 धावांचे लक्ष्य पूर्ण करताना, इंग्लंडचा 44.4 ओव्हरमध्ये 221 धावांवर ऑल आऊट झाला.

सध्या टीम ऑस्ट्रेलिया ही पॉइंट्सटेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाने यंदाच्या वर्ल्डकममध्ये 6 मॅचपैकी 5 मॅच जिंकल्या आहेत. तर इंग्लंड चौथ्या क्रमांकावर असून, संघाने 6 पैकी 4 सामने जिंकले आहेत. इंग्लंड-ऑस्ट्रेलिया या दोन्ही टीममध्ये आतापर्यंत एकूण 147 सामने खेळले गेले आहेत. यापैकी ऑस्ट्रेलियाने 81 तर इंग्लंडने 61 सामने जिंकले आहेत. (हेही वाचा: 'भारताकडून पराभवानंतर आत्महत्या करावी वाटली', पाकिस्तान प्रशिक्षक मिकी आर्थर चा खळबळजनक खुलासा)

असे होते संघ –

इंग्लंड : इयन मॉर्गन (कॅप्टन), मोईन अली, जोफ्रा आर्चर, जॉनी बेयरस्टो (विकेटकीपर), जॉस बटलर, टॉम कुरेन, लियाम डॉसन, लियाम प्लंकट, आदील राशिद, जो रूट, बेन स्टोक्स, जेम्स विंसे, क्रिस वोक्स आणि मार्क वुड.

आस्ट्रेलिया : एरॉन फिंच (कॅप्टन), डेव्हिड वार्नर, उस्मान ख्वाजा, जेसन बेहरनडार्फ, एलेक्स कॅरी (विकेटकीपर), नॅथन कुल्टर नाइल, पॅट कमिन्स, नॅथन लॉयन, शॉन मार्श, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्डसन, स्टीव स्मिथ, मिशेल स्टार्क, मार्क्स स्टोइनिस आणि एडम झॅंम्पा.

दरम्यान, इंग्लंडचे उर्वरित दोन सामने न्यूझीलंड आणि भारतासोबत होणार आहेत. जर इंग्लंडला उपांत्य फेरीत पोहचायचे असेल तर या दोन्ही संघांचा पराभव करणे गरजेचे आहे, जे फार कठीण आहे.