ICC World Cup 2019: विश्वकपमध्ये या 5 स्टार खेळाडूंनी केले सर्वाधिक निराश
तर दुसरीकडे असे खेळाडू आहे ज्यांच्या खेळीनी अत्यंत निराश केले आहे. आपण अशाच 5 स्टार खेळाडूंबद्दल चर्चा करू ज्यांना या विश्वकपमध्ये पुरेसे यश मिळाले नाही.
इंग्लंड (England) मध्ये सुरु असलेले आयसीसी (ICC) विश्वकप आपल्या अंतिम चरणी येऊन पोहचला आहे. विश्वकपच्या सेमीफाइनलसाठी 4 संघ जवळपास निश्चित झाले आहेत. ग्रुप स्टेजमध्ये आता केवळ 5 सामने बाकी आहे. सेमीफाइनलसाठी ऑस्ट्रेलिया (Australia), भारत (India) आणि इंग्लंडने आपले स्थान निश्चित केले आहेत तर चौथ्या क्रमांकासाठी न्यूझीलंड (New Zealand) उत्कृष्ट मानला आहे. यंदाच्या विश्वकपमध्ये भारताचा रोहित शर्मा (Rohit Sharma), ऑस्ट्रेलियाचा डेविड वॉर्नर (David Warner), मिशेल स्टार्क (Mitchell Starc) आणि अन्य खेळाडूंनी त्यांच्या केळीने प्रभावीत केले आहेत. तर दुसरीकडे असे खेळाडू आहे ज्यांच्या खेळीनी अत्यंत निराश केले आहे. (PAK vs BAN: World Cup 2019 च्या सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी पाकिस्तान याला 'हे' करावे लागणार आहे, जाणून घ्या काय आहे गणित)
हे खेळाडू म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील नामवंत क्रिकेटपटू. मात्र, विश्वकपमध्ये यंदा त्यांना आपली छाप सोडता आली नाही. आपण अशाच 5 स्टार खेळाडूंबद्दल चर्चा करू ज्यांना या विश्वकपमध्ये पुरेसे यश मिळाले नाही.
मार्टिन गप्टिल (Martin Guptill) (न्यूझीलंड)
न्यूझीलंड क्रिकेट संघाला त्यांनाच सलामीवीर मार्टिन गप्टिल ने आपल्या विश्वकपमधील प्रदर्शनाने चांगलेच निराश केले आहे. नऊ सामन्यातील आठ डावांमध्ये गप्टिलने केवळ अर्धशतक झळकावले आहे. गप्टिलने 2015 च्या विश्वकपमध्ये सर्वाधिक धावा केल्या होत्या. मात्र, त्याच्या यंदाच्या प्रदर्शनाने त्याच्या खेळीवर प्रश्न उपस्थित केले आहे. गप्टिलने मागील विश्वकपमध्ये 547 धावा केल्या होत्या तर यंदा त्याने आतापर्यंत केवळ 166 च धावा केल्या आहेत.
यापुढे, जर न्यूझीलंड सेमीफायनल आणि फाइनलमध्ये पोहोचला तर त्याच्याकडे आपली खेळी सुधारण्यासाठी आणखी दोन संधी असतील. यंदा, गप्टिलने आठ डावांत 73 *,25,35,0,5,20,8 अशा धावा केल्या आहेत.
राशिद खान (Rashid Khan) (अफगाणिस्तान)
जगातील टॉप-5 चा आणि अफगाणिस्तान (Afghanistan) चा स्टार फिरकी गोलंदाज राशिद खान ने यंदाचे विश्वकपमध्ये सर्वाधिक निराश केले आहेत. आपल्या तुफानी गोलंदाजीसाठी ओळखला जाणाऱ्या राशिदला साजेशी कामगिरी करता आली नाही. शिवाय, इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात राशिदने आपल्या 9 ओव्हरमध्ये 110 धावा दिल्या आणि विश्वकपच्या इतिहासातसर्वात महागडा गोलंदाज म्हणून ओळख निर्माण केली. इंग्लंडच्या फलंदाजांनी राशिदच्या बॉलिंगवर तब्बल 11 सिक्स लगावले.
एम एस धोनी (MS Dhoni) (भारत)
महेंद्र सिंग धोनी (Mahendra Singh Dhoni), टीम इंडिया चा 'कॅप्टन कूल' ने यंदाच्या विश्वकपमध्ये आपल्या चाहत्यांना चांगलेश निराश केले. त्याच्या संथ खेळीची चहू बाजून टीका केली जात आहे. आतापर्यंत धोनीने 7 सामन्यात 233 धावा केल्या आहेत. धोनीच्या खराब प्रदर्शनाने भारताच्या मधल्या फळीला नेहमीप्रमाणे कमकुवत मानले जात आहे. विश्वकपच्या आधी, धोनीने न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि आयपीएल मध्ये जंगले प्रदर्शन केले होते. मात्र, धोनीला आपला जुना फॉर्म टिकून ठेवता आला नाही आणि परिणामी तो गरजेच्या वेळी टीमला अडचणीतून बाहेर काढ्यात असार्थ दिसला.
यंदा, धोनी आपल्या बहुतेक सामन्यांमध्ये नाबाद राहिला पण, आपल्या आक्रमक खेळीची ओळखल्या जाणाऱ्या धोनीला साजेशी कामगिरी करता आली नाही.
ख्रिस गेल (Chris Gayle) (वेस्ट इंडिज)
युनिव्हर्स च्या बॉस बद्दल काई बोलावे असे झाले आहे. विश्वकप आधी गेल ने उल्लेखनीय कामगिरी करत वेस्ट इंडिज ला इंग्लंडविरुद्ध मालिका जिंकून दिली होती. गेलच्या आक्रमक फॉर्मच्या भरवश्यावर चाहत्यांनी आशा बांधली होती. पण गेल यंदा अपेक्षित अशी केली करण्यात अपयशी झाला. विश्वकपमध्ये यंदा गेलने 33.57 सह्या सरासरीने केवळ 235 धावा केल्यात.
वेस्ट इंडीजने केवळ एक सामना जिंकला आहे. आणि गुणतालिकेत 3 पॉईंट्स सह शेवटून दुसऱ्या क्रमांकावर आहे. गेलने यांचा एकही सामना स्वबळावर जिंकून दिला नाही.
ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) (ऑस्ट्रेलिया)
ऑस्ट्रेलियाचा 30 वर्षीय अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल संघासाठी कठीण आणि पण महत्त्वाचा काम आहे. मॅक्सवेल, ऑस्ट्रेलियाच्या मधल्या फळीतील फलंदाज मॅक्सवेलने बांग्लादेश (Bangladesh) आणि श्रीलंका (Sri Lanka) विरुद्ध सामन्यात एक छोटाशी भूमिका निभावली होती, पण अद्याप त्याला टूर्नामेंटमध्ये मोठी खेळी करता आली नाही.
मॅक्सवेलला वेस्ट इंडीज, भारत, पाकिस्तान, इंग्लंड आणि न्यूझीलंड या सामन्यात तुफानी खेळी करण्याची संधी मिळाली होती पण ती त्याचा लाभ उचलू शकला नाही. गत जेते ऑस्ट्रेलिया ने सेमीफाइनलमध्ये प्रवेश मिळवला आहे पण त्यांची मधली फळी कमकुवत दिसत आहे. मॅक्सवेलने या आधी ऑस्ट्रेलियाला कित्येक सामने जिंकून दिले आहे आणि संघाला पुन्हा एकदा विश्वकप जिंकायचा असेल तर, मॅक्सवेल ने पुढाकार घेऊन मोठी खेळी करण्याची गरज आहे.