ICC T20 World Cup 2021: आयसीसी टी-20 वर्ल्डकप 2021 च्या ग्रुप्सची घोषणा; भारत आणि पाकिस्तान एकाच गटात, रंगतदार सामन्याची क्रिकेट चाहत्यांना उस्तुकता

याचपार्श्वभूमीवर आयसीसीने आज टी-20 विश्वचषक 2021 च्या गटाची घोषणा केली आहे.

लवकरच आयसीसी टी-20 विश्वचषक 2021 ला (ICC T20 World Cup 2021) सुरुवात होणार आहे. याचपार्श्वभूमीवर आयसीसीने आज टी-20 विश्वचषक 2021 च्या गटाची घोषणा केली आहे. आयसीसीच्या टी20 विश्वचषक 2021 साठी 12 संघ खेळणार असून, ज्यांची विभागणी ए आणि बी अशी करण्यात आल्याचे आयसीसीच्या प्रमुखांनी सांगितले. तसेच 8 संघात क्वालीफायर सामने खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेला आणखी रंगतदार करण्यासाठी भारत आणि पाकिस्तानचा (India Vs Pakistan) एकाच गटात समावेश करण्यात आला आहे. यामुळे या स्पर्धेच्या सामन्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यात अनेक लढती होण्याची शक्यता आहे.

गट- अ मध्ये गतविजेत्या वेस्ट इंडीज इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिकाचा समावेश आहे. तर, गट- ब मध्ये अफगाणिस्तान, भारत, पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात सामना होणार आहे. या दोन्ही गटातून दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरवले जातील. हे देखील वाचा- IND vs SL ODI 2021: श्रीलंकेविरुद्ध मैदानात उतरताच कॅप्टन Shikhar Dhawan रचणार इतिहास, मोडणार 37 वर्ष जुना रेकॉर्ड

इंस्टाग्राम पोस्ट-

 

View this post on Instagram

 

A post shared by ICC T20 World Cup (@t20worldcup)

या स्पर्धेला येत्या 17 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. तसेच, कोरोना संकटामुळे हे सर्व सामने ओमन आणि यूएईमध्ये खेळले जाणार आहेत. कोरोनामुळे आयपीएल 2020 ची स्पर्धादेखील यूएईमध्ये पार पडली होती. त्यावेळी मुंबई इंडियन्सच्या संघाने आयपीएल 2020 चा खिताब जिंकला होता.