इंग्लंडच्या World Cup विजयानंतर आयसीसीने केली स्वत:च्या नियमांची टिंगल, इंग्लिश खेळाडूंचे FaceApp फोटो शेअर करत केले ट्रोल, पहा (Photo)
न्यूझीलंड-इंग्लंड विश्वकप फायनल मॅचनंतर आयसीसीने इंग्लिश खेळाडूंचे फेसएप फोटो शेअर केले आहे. या फोटो द्वारे आयसीसीने स्वतःच्या नियमांची टिंगल तर केलीच पण सोबत इंग्लडच्या खेळाडूंना देखील ट्रोल केले.
आयसीसी (ICC) क्रिकेट विश्वकपच्या अंतिम क्रिकेट सामन्यात मोठी चूरस पाहायला मिळाली. न्यूझीलंड (New Zealand) आणि इंग्लंड (England) यांच्यात चांगली लढत झाली. दोन्ही संघातील अंतिम सामना टाय झाला. त्यानंतर नियमानुसार सुपर ओव्हर खेळविण्यात आली. येथेही सामना टाय झाला. पण इंग्लंडने सर्वाधिक चौकार मण्याच्या आधारावर त्यांना विश्वविजेते म्हणून घोषित करण्यात आले. मात्र, अंपायरांनी ज्या आधारे विजय घोषित केला, त्यावर सोशल मीडिया आणि अन्य माध्यमांद्वारे जोरदार टीका होत आहे. अनेक महान खेळाडूंनी याबाबत निराशा व्यक्त. आता तर आयसीसीने आपल्याच नियमांची खिल्ली उडवली आहे. (ENG vs AUS, Ashes 2019: डोक्याला दुखापत झाल्यास सबस्टिट्यूट खेळाडूला ही बॅटिंग! अॅशेस पासून नियम लागू होण्याची शक्यता)
न्यूझीलंड-इंग्लंड विश्वकप फायनल टाय झाल्यानंतर सुपर ओव्हर देखील टाय झाली. पण या सामन्यात सर्वाधिक चौकार मारलेल्या यजमान इंग्लंड संघाला विजयी घोषीत करण्यात आले. त्यामुळे आयसीसीच्या या सुपर ओव्हरच्या नियमावर सर्वच स्तरांतून टीका होत आहे. दरम्यान, या चित्त थरारक मॅचनंतर आयसीसीने इंग्लिश खेळाडूंचे फेसएप फोटो शेअर केले आहे. या फोटो द्वारे आयसीसीने स्वतःच्या नियमांची टिंगल तर केलीच पण सोबत इंग्लडच्या खेळाडूंना देखील ट्रोल केले. पहा हे फोटोज:
इंग्लंडचा पुढील सामना ऑस्ट्रेलिया (Australia) शी अॅशेस (Ashes) सिरीज दरम्यान होणार आहे. अॅशेस 1 ऑगस्ट पासून 16 सप्टेंबर पर्यंत इंग्लंडच्या धर्तीवर खेळली जाईल. यजमानांच्या सर्व खेळाडूंचा फॉर्म पाहता त्यांचे पारडे जड दिसत आहे. पण ऑस्ट्रेलियाकडे देखील उच्च दर्जाचे खेळाडू आहे. ऑस्ट्रेलियाकडून यंदा स्टिव्ह स्मिथ (Steve Smith) आणि डेविड वॉर्नर (David Warner) यांच्या खेळण्याची शक्यता आहे.