ICC Cricket World Cup: विराट कोहली नंतर भारतीय संघाचा कर्णधार कोण? निवड समितीकडे आहेत हे 3 पर्याय

भारतीय क्रिकेट निवड समिती समोर सर्वात महत्वाचा प्रश्न आपल्या आहे की विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर त्याची जागा घेणार कोण? अशा वेळी निवड समितीकडे या 3 खेळाडूंचे पर्याय उपलब्ध आहे जे पुढे भारतीय संघ नेतृत्व करू शकतात.

(Photo Credits: Twitter)

क्रिकेट विश्वात कोणत्याही यशस्वी कर्णधाराची जागा घेणे हे कोणत्याही खेळाडू साठी कठीण असते. भारताच्या क्रिकेटच्या इतिहासात जेव्हा आपण यशस्वी कर्णधारबद्दल बोलतो तेव्हा आपल्या समोर येतात ते चेहरे 1983 विश्वकप विजेता कपिल देव (Kapil Dev), नवाब पतौडी (Navab Pataudi), सौरव गांगुली (Sourav Ganguly), महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) या सारख्या दिग्गज क्रिकेटर चे. यात आता एक नाव अजून जोडण्यात येईल आणि ते म्हणजे विराट कोहली (Virat Kohli).

कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने अनेक मालिका जिंकून आपली क्षमता दाखवून दिली आहे. सध्या इंग्लंड मधील आयसीसी (ICC) विश्वकपमध्ये देखील भारतीय संघ 4 मधील 3 सामने जिंकून अजय राहीला आहे. मात्र, याहूनही सर्वात महत्वाचा प्रश्न आपल्या समोर आहे की विराटच्या निवृत्तीनंतर त्याची जागा घेणार कोण? अशा वेळी निवड समितीकडे या 3 खेळाडूंचे पर्याय उपलब्ध आहे जे पुढे भारतीय संघ नेतृत्व करू शकतात. (IND vs AFG, ICC World Cup 2019: सुपरफास्ट विराट कोहली ला विश्वविक्रम करण्याची संधी; सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा ला ही टाकणार मागे)

पृथ्वी शॉ  (Prithvi Shaw)

2018 च्या U-19 विश्वकप विजेता पृथ्वी शॉ कडे सध्या भारतीय क्रिकेटमधील सर्वात वैभवशाली फलंदाज बघितले जात आहे. कोहली सारखेच पृथ्वी ने देखील U-19 विश्वकपमध्ये यशश्वीरित्या भारताचं नेतृत्व केले होते. यात कोणतीही शंका नाही की क्रिकेट तज्ञ शॉकडे भारताचा पुढील कर्णधार म्हणून पाहत आहे. शॉ ची चांगली टेकनिक आणि शांत स्वभाव त्याला मोठी खेळी खेळणारा एक सक्षम करणारा खेळाडू बनवते.

रिषभ पंत  (Rishabh Pant)

दिल्लीच्या रिषभ पंत ने आपल्या खेळीने कक्रिकेट विश्वात आपले नाव बनवले आहे. त्याच्या चांगल्या खेळामुळेच पंत ला भारताच्या कसोटी संघात स्थान देण्यात आले आहे. पंत ने मागील वर्षी इंग्लंड (England) विरुद्ध झालेल्या कसोटी दरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. वयाच्या अवघ्या २० व्या वर्षी पंतला २०१६-१७ च्या विजय हजारे ट्रॉफी मध्ये दिल्ली संघाचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली आणि ती त्याने चांगलंच पार पडली. जर त्याला संघात एक पक्की जागा देण्यात आली तर पंत त्या संधीच सोनं करून दाखवेल हे नक्की.

श्रेयस अय्यर (Shreyas Iyer)

यंदाच्या आपल्या आयपीएल (IPL) मधील खेळीने मुंबईच्या श्रेयस अय्यर ने आपली छाप सोडली आहे. श्रेयस च्या नेतृत्वाखाली दिल्लीचा संघ 2012 नंतर पहिल्यांदा आयपीएल च्या प्ले-ऑफ मध्ये पोहचला. त्याच्या खेळासह त्याच्या कॅप्टीन्सी ने देखील चाहत्यांचे मन जिंकले. शिवाय अय्यर भारत-ए संघाचं देखील नेतृत्व करतो. अय्यर आणि कोहलीच्या खेळात बरेच साम्य आहे जे त्याला विराट कोहलीचा योग्य उत्तराधिकारी बनविते.