ICC Cricket World Cup 2019: रविंद्र जडेजा, रोहित शर्मा यांनी केली 'टीम इंडिया'ची पोलखोल (Watch Videos)

भारतीय क्रिकेट संघातील ऑलराऊंडर खेळाडू रविंद्र जडेजा आणि हिटमॅन रोहित शर्मा यांचे व्हिडिओज सोशल मीडियावर सध्या चांगलेच व्हायरल होत आहेत. पहा टीम इंडियाची पोलखोल करणारे हे व्हिडिओज...

Ravindra Jadeja & Rohit Sharma (Photo Credits: File Photo)

ICC Cricket World Cup 2019: भारतीय क्रिकेट संघातील ऑलराऊंडर खेळाडू रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांचे व्हिडिओज सध्या सोशल मीडियावर सध्या चांगलेच व्हायरल होत आहे. रॅपिड फायर राऊंड मधील रविंद्र जडेजा आणि रोहित शर्मा यांचा मस्तीभरा अंदाज चाहत्यांना चांगलाच भावत आहे. या रॅपिड फायर राऊंडमध्ये जडेजा आणि रोहितला काही खास प्रश्न विचारण्यात आले असून त्यांनी दिलेली उत्तरे पाहण्यासारखी आहेत. या राऊंडमध्ये त्यांना सर्वात वाईट डान्सर, सर्वात अधिक सेल्फी घेणारे टीममेट, गुगलवर स्वत:लाच सर्च करणारा खेळाडू यांसारखे धमाल प्रश्न विचारण्यात आले आहेत आणि रोहित, जडेजाने देखील या प्रश्नांची दिलखुलास उत्तरे दिली आहेत.

रविंद्र जडेजा याचा व्हिडिओ:

त्याचबरोबर हिटमॅन रोहित शर्मा याचा देखील असाच व्हिडिओ समोर आला आहे.

वर्ल्डकप पूर्वी रविंद्र जडेजा, रोहित शर्मा यांच्या या धमाकेदार व्हिडिओंना चाहत्यांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. (ICC World Cup 2019 Opening Ceremony: जाणून घ्या कुठे आणि कधी बघाल वर्ल्डकपचा उद्धाटन सोहळा)

उद्यापासून (30 मे) वर्ल्डकप मधील पहिला सामना इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात रंगणार आहे. तर 5 जून रोजी भारतीय क्रिकेट संघाची भिडत दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement