ICC Cricket World Cup 2019: विश्वचषक कोण जिंकणार? कपिल देव यांनी सांगितले अंतिम विजयाचे प्रबळ दावेदार

त्या वेळी कपिल देव यांच्याकडे संघाचे नेतृत्व होते. त्या वेळी कर्णधार म्हणून कपिल देव यांनी केलेली कामगिरी आजही अनेकांच्या स्मरणात आहे.

कपिल देव, भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार | (Photo Credit-Getty)

आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप 2019 (ICC Cricket World Cup 2019) स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघ अंतिम विजयासाठी प्रबळ दावेदार मानला जात आहे. भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि सध्याचे आघाडीचे समालोचक कपिल देव (Kapil Dev) यांनी आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप 2019 (ICC Cricket World Cup 2019) यांनीही या दाव्याची पूष्टी केली. यंदा विश्वचषकाचा प्रबळ दावेदार कोण? असे विचारले असता भारत, इग्लंड आणि ऑस्ट्रेलिया हे या देशाचे संघ यंदाच्या आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेत अंतिम विजयाचे प्रबळ दावेदार असतील असे कपिल देव यांनी म्हटले. ब्रिटानिया द्वारा आयोजित एका कार्यक्रमता ते बुधवारी बोलत होते.

भारताबद्दल बोलताना कपिल देव म्हणाले, भारतीय क्रिकेट संघाकडे युवा आणि अनुभवी खेळाडूंचे चांगले समप्रमाण आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व संघांवर नजर टाकता ध्यानात येणार गोष्ट म्हणजे भारतीय टीमकडे अधिक अनुभवी आणि संतुलन असलेले खेळाडू आहेत. आपल्याकडे चार वेगवान गोलंदाज आहेत. तर, विराट कोहली , महेंद्र सिंह धोनी यांच्यासारखे स्फोटक फलंदाज आहेत. दरम्यान, भारत, इग्लंड, ऑस्ट्रेलिया यांच्याशीवाय चौथ्या क्रमांकावरील संघाबबत फारसे अनुमान लावता येत नाही. मात्र, न्युझीलंडचा संघ चांगला आहे. पाकिस्तानही काही करु शकतो. वेस्टइंडीज, दक्षिण अफ्रीका असेही संघ आहेत. पण, पहिले तीन संघच विजयाचे प्रबळ दावेदार ठरु शकतात असे वाटते, असेही कपील देव म्हणाले.

अवघे क्रीडा विश्व आणि क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागून राहिलेल्या आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप 2019 (ICC Cricket World Cup 2019) ची तयारी अंतीम टप्प्यात आली आहे. विश्वचषकासाठी विविध देशांनी आपापल्या संघाची घोषणा केली असून, कोणत्या संघाचा सामना कोणासोबत याचे वेळापत्रकही जाहीर झाले आहे. अशात यंदा विश्वचषकावर कोण आपले नाव कोरणार याबाबत उत्सुकता आहे. भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि सध्याचे आघाडीचे समालोचक कपिल देव (Kapil Dev) यांना प्रसारमाध्यमांनी हा प्रश्न विचारला असता कपिल देव यांनी अत्यंत सूचक आणि महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिली. (ICC Cricket World Cup 2019: अवघ्या 48 तासात विकली गेली भारत-पाकिस्तान सामन्याची तिकिटे)

कपील देव यांनी 1983 मध्ये भारताल पहिला विश्वचषक जिंकून दिला. त्या वेळी कपिल देव यांच्याकडे संघाचे नेतृत्व होते. त्या वेळी कर्णधार म्हणून कपिल देव यांनी केलेली कामगिरी आजही अनेकांच्या स्मरणात आहे.