मी जेव्हा मैदानात असतो तेव्हा फक्त संघाचाच विचार करतो- अजिंक्य रहाणे

या दरम्यान भारतीय संघाने उत्तम कामगिरी बजावली आहे. वेस्ट इंडीजविरोधात पहिल्या कसोटी सामन्यात सलामी फलंदाजांनी भारताला निराश केले. अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) जेव्हा खेळायला आला त्यावेळी भारतीय संघ २५ धावांवर ३ बाद या परिस्थितीत होता. संकटात असलेल्या भारतीय संघाला अजिंक्य रहाणेच्या संयमी खेळली सावरले. पंरतु, दरम्यान रहाणेचे शतक हुकले. परंतु त्याला शतक करता आले नाही याचे काहीच दुख नाही. मी केवळ संघाचाच विचार करत असतो.

ajinkya rahane

भारतीय क्रिकेट संघ (Indian cricket Team) वेस्टइंडीज (West Indies) दौऱ्यावर आहे. या दरम्यान भारतीय संघाने उत्तम कामगिरी बजावली आहे. वेस्ट इंडीजविरोधात पहिल्या कसोटी सामन्यात सलामी फलंदाजांनी भारताला निराश केले. अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) जेव्हा खेळायला आला त्यावेळी भारतीय संघ २५ धावांवर ३ बाद या परिस्थितीत होता. संकटात असलेल्या भारतीय संघाला अजिंक्य रहाणेच्या संयमी खेळली सावरले. पंरतु, दरम्यान रहाणेचे शतक हुकले. परंतु त्याला शतक करता आले नाही याचे काहीच दुख नाही. मी केवळ संघाचाच विचार करत असतो.

वेस्टइंडीज विरोधच्या कसोटी सामन्यामध्ये भारतीय संघाचे कर्णधार पद अजिंक्य रहाणेकडे सोपण्यात आले आहे. या दरम्यान अजिंक्य रहाणे ८१ धावांची चांगली खेळी करत भारतीय संघाला सावरले. परंतु या सामन्यात अजिंक्य रहाणे याला शतक करता आले नाही. गेल्या कित्येक सामन्यांपासून अजिंक्य रहाणेला शतक करता आलेले नाही. यामुळे अनेकांनी अजिंक्य रहाणेच्या खेळीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. दिवसभराचा खेळ संपल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत रहाणे म्हणाला की, 'मला वाटते या धावपट्टीवर ८१ धावांचा खेळही खूप होता आणि आता आम्ही या कसोटीत चांगल्या स्थितीत आहोत. मी जेव्हा मैदानात असतो तेव्हा फक्त संघाचाच विचार करतो, मी स्वार्थी नाही. त्यामुळे मला शतक हुकल्याचे दु:ख नाही.'

हे देखील वाचा- जसप्रीत बुमराहला 'हा' फोटो शेअर करणे पडले महागात, ट्रोलर्सकडून मिम्स शेअर

संघासाठी केलेले योगदान जास्त महत्त्वाचे ठरते. मी माझ्या शतकाबद्दल विचार करत होतो. पण त्याची मला फार चिंता नव्हती. परिस्थितीनुसार खेळणे अधिक महत्त्वाचे होते.' असेही रहाणे म्हणाला. रहाणेने यापूर्वीचे शतक २०१७ मध्ये श्रीलंकेविरुद्ध (Srilanka) ठोकले होते.