How to Watch CSK vs KKR, IPL 2022 Live in India: सलामीच्या लढतीत चेन्नई-कोलकाता आमनेसामने, कुठे व कसे पाहणार लाइव्ह स्ट्रीमिंग आणि लाइव्ह टेलिकास्ट?
आयपीएल गतविजेते चेन्नई सुपर किंग्ज (CSK) शनिवारी स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स (KKR) विरुद्ध सलामीचा सामना खेळतील. रवींद्र जडेजा CSK चे नेतृत्व करेल, तर श्रेयस अय्यर KKR संघाची कमान सांभाळेल. CSK विरुद्ध KKR सलामीच्या सामन्याच्या नाणेफेकीची वेळ, लाइव्ह स्ट्रीमिंग आणि ब्रॉडकास्टबाबत सर्व तपशील माहिती जाणून.
IPL 2022, CSK vs KKR Match 1 Live Streaming: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 15 चा पहिला सामना आज मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर गतविजेता चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यात होणार आहे. आयपीएल मेगा लिलावानंतर दोन्ही संघ बदलले आहेत. KKR ने आयपीएल (IPL) लिलावात श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याला 12.25 कोटी रुपयांत खरेदी करून नवा कर्णधार नियुक्त केले. अय्यरच्या नेतृत्वातील संघ तिसऱ्या विजेतेपदाच्या शोधात आज मैदानात उतरेल. दुसरीकडे चेन्नई सुपर किंग्जबद्दल बोलायचे तर आयपीएल 2008 पासून संघाचे नेतृत्व करत असलेला एमएस धोनीने अष्टपैलू रवींद्र जडेजाच्या (Ravindra Jadeja) हाती संघाची कमान सोपवली. अशा परिस्थितीत आता हे दोन्ही संघ आज नव्या कर्णधारांसह मैदानात उतरणार आहेत. यापूर्वी CSK विरुद्ध KKR सलामीच्या सामन्याच्या नाणेफेकीची वेळ, लाइव्ह स्ट्रीमिंग आणि ब्रॉडकास्टबाबत सर्व तपशील जाणून. (IPL मध्ये ‘या’ दोनच खेळाडूंच्या नेतृत्वात MS Dhoni खेळला आहे, तुम्हाला माहीत आहे का?)
चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध KKR आयपीएल 2022 मधील पहिला सामना 26 मार्च रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला जाणार आहे. आयपीएल 2022 चा पहिला सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरु होईल. या नाणेफेक सामन्याच्या अर्धातास पूर्वी म्हणजे, संध्याकाळी 7 वाजता होईल. चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स आयपीएल 15 चा पहिला सामना भारतीय चाहत्यांसाठी स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रसारित केला जाईल. आयपीएल सामन्यांसाठी फक्त 25 टक्के प्रेक्षकांना स्टेडियममध्ये जाण्यास परवानगी असल्यामुळे चाहते वेगवेगळ्या भाषांमध्ये स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर सामन्याचा लाइव्ह आनंद लुटू शकतात. याशिवाय, जर तुम्हाला तुमच्या स्मार्टफोन किंवा टॅब्लेटवर पहिल्या सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग पहायचे असेल, तर तुम्ही Disney+ Hotstar अॅपवर सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग पाहू शकतात. हॉटस्टारच्या वेबसाइटवर लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवर देखील सामना लाइव्ह उपलब्ध असेल.
चेन्नई-कोलकाता संघ:
चेन्नई सुपर किंग्स: रवींद्र जडेजा (कॅप्टन), एमएस धोनी (विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड, रॉबिन उथप्पा, डेव्हन कॉन्वे, अंबाती रायडू, शिवम दुबे, ड्वेन-ब्रावो, ख्रिस जॉर्डन, तुषार देशपांडे, केएम आसिफ, सुब्रांशू सेनापती, अॅडम मिल्ने, भगत वर्मा, एन. जगदीसन, दीपक चाहर, सी हरी निशान, ड्वेन प्रिटोरियस, सिमरजीत सिंह, राजवर्धन हंगरगेकर, महेश तीक्षणा, प्रशांत सोलंकी, मोईन अली, मिचेल सँटनर.
कोलकाता नाईट रायडर्स: श्रेयस अय्यर (कॅप्टन), वेंकटेश अय्यर, अजिंक्य रहाणे, नितीश राणा, सॅम बिलिंग्ज (विकेटकीपर), आंद्रे रसेल, मोहम्मद नबी, सुनील नारायण, उमेश यादव, शिवम मावी, वरुण चक्रवर्ती, शेल्डन जॅक्सन, पॅट कमिन्स, आरोन फिंच, बाबा इंद्रजित, रिंकू सिंह, अभिजीत तोमर, प्रथम सिंह, अमन खान, रसिक सलाम, रमेश कुमार, अशोक शर्मा, अनुकुल सुधाकर रॉय, चमिका करुणारत्ने, टीम साउदी.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)