How to Download Hotstar & Watch RCB vs SRH Live Match: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील लाईव्ह सामना पाहण्यासाठी हॉटस्टार डाउनलोड कसे करावे? इथे पाहा

इंडियन प्रीमियर लीग 2020 च्या 52व्या सामन्यात विराट कोहलीच्या नेतृत्वातील रॉयल्स चॅलेंजर्स बेंगलोरचा सामना आज सनरायझर्स हैदराबादशी होणार आहे. जर तांत्रिक अडचणींनीमुळे तुम्ही टी.व्ही पाहता येत नसेल तर, डिस्नी+ हॉटस्टारवर आयपीएल लाइव्ह पाहू शकतात. डिस्नी+ हॉटस्टार यावर्षी आयपीएलचा स्ट्रीमिंग पार्टनर आहे. अशा स्थितीत, हॉटस्टारवर आजचा सामनादेखील पाहता येणार आहे.

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Photo Credit: PTI)

RCB vs SRH 52nd IPL Match 2020: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2020 च्या 52व्या सामन्यात विराट कोहलीच्या नेतृत्वातील रॉयल्स चॅलेंजर्स बेंगलोरचा (Royal Challengers Bangalore) सामना आज सनरायझर्स हैदराबादशी (Sunrisers Hyderabad) होणार आहे. आजच्या सामन्यात बेंगलोरने हैदराबादविरुद्ध विजय मिळविल्यास ते प्ले ऑफसाठी क्वालिफाय करतील, तर आजची स्पर्धा हैदराबादसाठी 'करा किंवा मरा'ची आहे. आयपीएल 2020 मध्ये आतापर्यंत दोन्ही संघांच्या कामगिरीबद्दल आरसीबी संघ 12 सामन्यांनंतर 14 गुणांसह सात विजय आणि 12 पराभवांसह दुसर्‍या स्थानावर आहे. हैदराबाद संघ 12 सामन्यांत पाच विजय आणि सात पराभवानंतर 10 गुणांसह सातव्या स्थानावर आहे. आजच्या सामन्यातील पराभवामुळे हैदराबादसमोर प्ले ऑफ शर्यतीतून बाहेर पाडण्याचे संकट उभे आहे, तर बेंगलोरसाठी देखील अंतिम चारमध्ये पोहचण्याचे आव्हान कठीण होऊ शकते. (RCB vs SRH, IPL 2020 Live Streaming: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील आयपीएल लाईव्ह सामना आणि स्कोर पाहा Hotstar आणि Star Network वर)

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे भारतात सर्वाधिक लोकप्रिय असलेली आयपीएलची स्पर्धा यावर्षी भारताऐवजी युएईमध्ये खेळवला जात आहे. जर तांत्रिक अडचणींनीमुळे तुम्ही टी.व्ही पाहता येत नसेल तर, चिंता करण्याची गरज नाही. आपण डिस्नी+ हॉटस्टारवर आयपीएल लाइव्ह पाहू शकतात. डिस्नी+ हॉटस्टार यावर्षी आयपीएलचा स्ट्रीमिंग पार्टनर आहे. अशा स्थितीत, डिस्नी+ हॉटस्टारवर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात रंगणारा आजचा सामनादेखील पाहता येणार आहे. हा सामना संध्याकाळी 7.30 वाजेपासून लाईव्ह प्रक्षेपित केला जाईल.

पाहा हॉटस्टार डाउनलोड करण्याच्या स्टेप्स:

1. प्रथम, आपल्या मोबाईमधील इंटरनेट सुरु करा आणि प्ले- स्टोर उघडून हॉटस्टार ऍप शोधा.

2. यानंतर इन्स्टॉल ऑप्शनवर जाऊन हॉटस्टार ऍप आपल्या फोनमध्ये इन्स्टॉल करा.

3. इन्स्टॉल केल्यानंतर, आपल्या मोबाईलच्या मेनूमध्ये किंवा मुख्यपृष्ठावर हॉटस्टार अ‍ॅप चिन्ह दिसेल.

4. यानंतर आपण आपल्या जीमेल किंवा फेसबुक अकाउंटवरून साइन इन करून किंवा आवश्यक तपशील देऊन अ‍ॅप उघडू शकतात.

5. साइन इन होताच आपण लाईव्ह व्हिडिओ, क्रीडा टूर्नामेंट जसे की आयपीएल, टीव्ही मालिका, चित्रपट आणि बरेच काही हॉटस्टार वर पाहता येणार आहे.

हिंदी, इंग्रजी, बंगाली, तामिळ, पंजाबी अशा बर्‍याच भाषांमध्ये हॉटस्टार उपलब्ध आहे. टीव्ही मालिका, बातम्या, चित्रपट यासह हॉटस्टारवर 1 लाख तासांपर्यंतची व्हिडीओ कन्टेन्ट उपलब्ध आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now