How to Download Hotstar & Watch KKR Vs MI IPL 2021 Match 5: कोलकाता नाईड राईडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यातील आयपीएल सामना पाहण्यासाठी हॉटस्टार कसे डाउनलोड कराल? घ्या जाणून
कोलकाता नाईड राईडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स (Kolkata Knight Riders Vs Mumbai Indians) यांच्यात आज आपएलच्या चौदाव्या हंगामातील पाचवा आज सामना खेळला जाणार आहे.
कोलकाता नाईड राईडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स (Kolkata Knight Riders Vs Mumbai Indians) यांच्यात आज आपएलच्या चौदाव्या हंगामातील पाचवा सामना खेळला जाणार आहे. चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम मैदानात (M. A. Chidambaram Stadium) पार पडणार आहे. कोलकाता नाईट राईडर्स संघाचे नेतृत्व इयॉन मॉर्गन करणार आहे. तर, मुंबई इंडियन्स संघाच्या कर्णधार पदाची जबाबदारी रोहीत शर्मावर आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएलचे 14 वे हंगाम प्रेक्षकांविना पार पडणार आहेत. अशास्थितीत लाईव्ह ऑनलाईन स्ट्रीमिंगसाठी Disney+ Hotstar हा प्रेक्षकांसाठी एक उत्तम पर्याय ठरणार आहे.
Disney+ Hotstar यंदा देखील आयपीएलचे स्ट्रीमिंग पार्टनर आहे. कोलकाता नाईट राईडर्स आणि मुंबई इंडियन्स संघातील आयपीएलचा पाचवा सामना लाईव्ह प्रसारित करणार आहेत. आजचा सामना पाहण्यासाठी आपण आपल्या स्मार्टफोनवर Diseny+ Hotstar डाउनलोड करू शकता. दरम्यान, दोन्ही संघातील आजचा आयपीएलचा सामना लाइव्ह पाहण्यासाठी Android यूजर्ससाठी हॉटस्टार गुगल स्टोअरवर उपलब्ध असेल, तर Apple मोबाईल यूजर्ससाठी अॅप स्टोअरवर उपलब्ध आहे. Disney+Hotstar डाउनलोड करण्यासाठी आपल्याला या सोप्प्या स्टेप्स फॉलो करायच्या आहेत. हे देखील वाचा- IPL 2021 Points Table Updated: राजस्थान रॉयल्सला पराभूत केल्यानंतर पंजाब किंग्जची गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी झेप; पाहा संपूर्ण यादी
1. हॉटस्टार डाउनलोड करणे खूप सोपे आहे. आपल्या प्ले स्टोअर वर जा आणि हॉटस्टार शोधा.
2. मग इन्स्टॉल पर्यायवर जाऊन क्लिक करा आणि आपल्या फोनमध्ये अॅप इन्स्टॉल करा.
3. आता, आपल्या अॅप्लिकेशन मेनूमध्ये किंवा होम स्क्रीनवर आपल्याला एक हॉटस्टार अॅपचे चिन्ह दिसेल.
4. आपण आपल्या जीमेल किंवा फेसबुक अकाउंटने साइन इन करुन अॅप उघडू शकता किंवा आवश्यक तपशील प्रदान करून साइन अप करू शकता.
5. आता आपण लाईव्ह व्हिडिओ, क्रीडा स्पर्धा जसे की आयपीएल, टीव्ही शो, चित्रपट आणि बरेच काही पाहू शकता.
हॉटस्टार अॅपद्वारे आपण आजचा सामना लाइव्ह आपल्या मोबाईलवर पाहू शकता. आपण आपल्या फोनवर सहजपणे हा अॅप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता. आयपीएलचे सामने यंदा हॉटस्टार हिंदी, इंग्रजी, बंगाली, तमिळ, पंजाबी आणि मराठी अशा भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहे.
(The above story first appeared on LatestLY on Apr 13, 2021 03:42 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

