How to Download Hotstar & Watch CSK vs KKR Live Match: चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील लाईव्ह सामना पाहण्यासाठी हॉटस्टार डाउनलोड कसे करावे? इथे पाहा
इंडियन प्रीमियर लीग 2020 च्या 49व्या सामन्यात गुरुवारी चेन्नई सुपर किंग्जचा सामना कोलकाता नाईट रायडर्सशी होणार आहे. जर तांत्रिक अडचणींनीमुळे तुम्ही टी.व्ही पाहता येत नसेल तर, आपण डिस्नी+ हॉटस्टारवर आयपीएल लाइव्ह पाहू शकतात. हॉटस्टारवर चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात रंगणारा आजचा सामना 7.30 वाजेपासून लाईव्ह प्रक्षेपित केला जाईल.
CSK vs KKR 49th IPL Match 2020: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2020 च्या 49व्या सामन्यात गुरुवारी चेन्नई सुपर किंग्जचा (Chennai Super Kings) सामना कोलकाता नाईट रायडर्सशी (Kolkata Knight Riders) होणार आहे. आयपीएल (IPL) 2020 मध्ये सीएसकेचे (CSK) आव्हान संपुष्टात आले असताना आता ते अन्य संघांची समीकरणं बिघडवण्याच्या प्रयत्नात असतील. या सामन्यात कोलकाता संघाचा पराभव झाला तर त्यांनाही प्ले-ऑफमध्ये पोहोचण्यात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. आयपीएल 2020 मध्ये दोन्ही संघांच्या कामगिरीबाबत चेन्नईची कामगिरी यंदा फारशी खास राहिली नाही आणि परिस्थिती अशी आहे की एमएस धोनीच्या नेतृत्वातील संघ आठ पराभव आणि अवघ्या चार विजयांसह 12 सामन्यांनंतर 8 गुणांसह पॉईंट्स टेबलवर तळाशी आहेत, तर कोलकाता संघ 12 सामन्यांनंतर अनुक्रमे 6 पराभव आणि विजयात 12 पॉईंट्ससह पाचव्या स्थानावर आहे. (CSK vs KKR, IPL 2020 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील आयपीएल लाईव्ह सामना आणि स्कोर पाहा Hotstar आणि Star Network वर)
कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे भारतात सर्वाधिक लोकप्रिय असलेली आयपीएलची स्पर्धा यावर्षी भारताऐवजी युएईमध्ये खेळवला जात आहे. जर तांत्रिक अडचणींनीमुळे तुम्ही टी.व्ही पाहता येत नसेल तर, चिंता करण्याची गरज नाही. आपण डिस्नी+ हॉटस्टारवर आयपीएल लाइव्ह पाहू शकतात. डिस्नी+ हॉटस्टार यावर्षी आयपीएलचा स्ट्रीमिंग पार्टनर आहे. अशा स्थितीत, डिस्नी+ हॉटस्टारवर चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात रंगणारा आजचा सामनादेखील पाहता येणार आहे. हा सामना संध्याकाळी 7.30 वाजेपासून लाईव्ह प्रक्षेपित केला जाईल.
पाहा हॉटस्टार डाउनलोड करण्याची पद्धत-
- प्रथम, आपल्या मोबाईमधील इंटरनेट सुरु करा आणि प्ले- स्टोर उघडून हॉटस्टार ऍप शोधा.
- यानंतर इन्स्टॉल ऑप्शनवर जाऊन हॉटस्टार ऍप आपल्या फोनमध्ये इन्स्टॉल करा.
- इन्स्टॉल केल्यानंतर, आपल्या मोबाईलच्या मेनूमध्ये किंवा मुख्यपृष्ठावर हॉटस्टार अॅप चिन्ह दिसेल.
- यानंतर आपण आपल्या जीमेल किंवा फेसबुक अकाउंटवरून साइन इन करून किंवा आवश्यक तपशील देऊन अॅप उघडू शकतात.
- साइन इन होताच आपण लाईव्ह व्हिडिओ, क्रीडा टूर्नामेंट जसे की आयपीएल, टीव्ही मालिका, चित्रपट आणि बरेच काही हॉटस्टार वर पाहता येणार आहे.
हिंदी, इंग्रजी, बंगाली, तामिळ, पंजाबी अशा बर्याच भाषांमध्ये हॉटस्टार उपलब्ध आहे. टीव्ही मालिका, बातम्या, चित्रपट यासह हॉटस्टारवर 1 लाख तासांपर्यंतची व्हिडीओ कन्टेन्ट उपलब्ध आहे.
(The above story first appeared on LatestLY on Oct 29, 2020 04:58 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

