How to Download Hotstar & Watch DC vs CSK Live Match: दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील लाईव्ह सामना पाहण्यासाठी हॉटस्टार डाउनलोड कसे करावे? इथे पाहा
दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील लाईव्ह सामना पाहण्यासाठी हॉटस्टार डाउनलोड कसे करावे? जर तांत्रिक अडणींनीमुळे तुम्हाला या लीगमधील सामने टीव्ही पाहता येत नसेल तर आपण डिस्नी+ हॉटस्टार अॅप वर आयपीएल लाइव्ह पाहू शकतात. हा सामना संध्याकाळी 7.30 वाजेपासून लाईव्ह प्रक्षेपित केला जाईल.
DC vs CSK, IPL 2020 Live Match: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2020च्या 34 व्या सामन्यात आज विजय रथवर स्वार असलेल्या दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) सामना माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्याशी चेन्नई सुपर किंग्सशी (Chennai Super Kings) होईल. आजच्या सामन्यात श्रेयस अय्यरची जागा सलामी फलंदाज शिखर धवन दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व करू शकतो. राजस्थान रॉयल्सविरुद्ध मागील सामन्यात श्रेयसच्या खांद्याला दुखापत झाली होती, ज्यामुळे त्याला सामन्या दरम्यान मैदान सोडून जावे लागले होते. आयपीएल 2020 मध्ये दिल्ली आणि चेन्नईच्या कामगिरीबद्दल बोलायचे तर दिल्ली टीम यंदा शानदार प्रदर्शन करत आहे. संघाने आठ सामन्यांत केवळ दोन पराभव व सहा विजयांसह 12 गुणांसह टेबलमध्ये दुसरे स्थान मिळवले आहे. दुसरीकडे, चेन्नईची यावर्षीची कामगिरी फारशी खास नव्हती. चेन्नईचा संघ आठ सामन्यात पाच पराभव आणि तीन विजयात 6 गुणांसह गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे. चेन्नईला यंदा आयपीएलची प्ले-ऑफ फेरी गाठण्यासाठी आगामी सर्व सामने जिंकण्याची गरज आहे. अशा स्थतीत आज त्यांच्यासमोर दिल्लीचे कडवे आव्हान असेल. (DC vs CSK, IPL 2020 Live Streaming: दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील आयपीएल लाईव्ह सामना आणि स्कोर पाहा Hotstar आणि Star Network वर)
कोरोना व्हायरसचा वाढत प्रादुर्भाव लक्षात घेता क्रिकेट विश्वातील सर्वात लोकप्रिय टी-20 लीग आयपीएल यंदा भारताऐवजी युएईमध्ये खेळवली जात आहे. जर तांत्रिक अडणींनीमुळे तुम्हाला या लीगमधील सामने टीव्ही पाहता येत नसेल तर, चिंता करण्याची गरज नाही. आपण डिस्नी+ हॉटस्टार अॅप वर आयपीएल लाइव्ह पाहू शकतात. हॉटस्टार यावर्षी आयपीएलचा स्ट्रीमिंग पार्टनर आहे. अशा स्थितीत, डिस्नी+ हॉटस्टारवर दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात रंगणारा आजचा सामना देखील पाहता येणार आहे. हा सामना संध्याकाळी 7.30 वाजेपासून लाईव्ह प्रक्षेपित केला जाईल.
पाहा हॉटस्टार डाउनलोड करण्याची पद्धत:
1. प्रथम, आपल्या मोबाईमधील इंटरनेट सुरु करा आणि प्ले- स्टोर उघडून हॉटस्टार ऍप शोधा.
2. यानंतर इन्स्टॉल ऑप्शनवर जाऊन हॉटस्टार ऍप आपल्या फोनमध्ये इन्स्टॉल करा.
3. इन्स्टॉल केल्यानंतर, आपल्या मोबाईलच्या मेनूमध्ये किंवा मुख्यपृष्ठावर हॉटस्टार अॅप चिन्ह दिसेल.
4. यानंतर आपण आपल्या जीमेल किंवा फेसबुक अकाउंटवरून साइन इन करून किंवा आवश्यक तपशील देऊन अॅप उघडू शकतात.
5. साइन इन होताच आपण लाईव्ह व्हिडिओ, क्रीडा टूर्नामेंट जसे की आयपीएल, टीव्ही मालिका, चित्रपट आणि बरेच काही हॉटस्टार वर पाहता येणार आहे.
हिंदी, इंग्रजी, बंगाली, तामिळ, पंजाबी अशा बर्याच भाषांमध्ये हॉटस्टार उपलब्ध आहे. टीव्ही मालिका, बातम्या, चित्रपट यासह हॉटस्टारवर 1 लाख तासांपर्यंतची व्हिडीओ कन्टेन्ट उपलब्ध आहे.
(The above story first appeared on LatestLY on Oct 17, 2020 04:17 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

