How to Download Hotstar & Watch CSK Vs RR IPL 2021 Match 12: चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यातील आयपीएल सामना पाहण्यासाठी हॉटस्टार कसे डाउनलोड कराल? घ्या जाणून

चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स (Chennai Super Kings Vs Rajasthan Royals) यांच्यात आज (19 एप्रिल) आयपीएलच्या चौदाव्या हंगामातील 12वा सामना खेळला जाणार आहे. मुंबईच्या (Mumbai) वानखेडे मैदानात (Wankhede Stadium) हा सामना पार पडणार आहे.

How to Download Hotstar & Watch CSK Vs RR IPL 2021 Match 12: चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यातील आयपीएल सामना पाहण्यासाठी हॉटस्टार कसे डाउनलोड कराल? घ्या जाणून
राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स (Photo Credit: PTI)

चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स (Chennai Super Kings Vs Rajasthan Royals) यांच्यात आज (19 एप्रिल) आयपीएलच्या चौदाव्या हंगामातील 12वा सामना खेळला जाणार आहे. मुंबईच्या (Mumbai) वानखेडे मैदानात (Wankhede Stadium) हा सामना पार पडणार आहे. चेन्नई सुपर किंग्ज संघाचे नेतृत्व महेंद्र सिंह धोनी करत आहे. तर, राजस्थान रॉयल्स संघाच्या कर्णधार पदाची जबाबदारी संजू सॅमसन याच्यावर सोपवण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएलचे 14 वे हंगाम प्रेक्षकांविना पार पडणार आहेत. अशास्थितीत लाईव्ह ऑनलाईन स्ट्रीमिंगसाठी Disney+ Hotstar हा प्रेक्षकांसाठी एक उत्तम पर्याय ठरणार आहे.

Disney+ Hotstar यंदा देखील आयपीएलचे स्ट्रीमिंग पार्टनर आहे. चेन्नई आणि राजस्थान यांच्यातील आयपीएलचा 12 वा सामना लाईव्ह प्रसारित करणार आहेत. आजचा सामना पाहण्यासाठी आपण आपल्या स्मार्टफोनवर Diseny+ Hotstar डाउनलोड करू शकता. दरम्यान, दोन्ही संघातील आजचा आयपीएलचा सामना लाइव्ह पाहण्यासाठी Android यूजर्ससाठी हॉटस्टार गुगल स्टोअरवर उपलब्ध असेल. तर, Apple मोबाईल यूजर्ससाठी अ‍ॅप स्टोअरवर उपलब्ध आहे. Disney+Hotstar डाउनलोड करण्यासाठी आपल्याला खालील सोप्प्या स्टेप्स फॉलो करायच्या आहेत. हे देखील वाचा- IPL 2021 Points Table Updated: दिल्लीच्या विजयाने मुंबई इंडियन्सला धक्का, DC संघाने गुणतालिकेत मोठी झेप

1. हॉटस्टार डाउनलोड करणे खूप सोपे आहे. आपल्या प्ले स्टोअर वर जा आणि हॉटस्टार शोधा.

2. मग इन्स्टॉल पर्यायवर जाऊन क्लिक करा आणि आपल्या फोनमध्ये अ‍ॅप इन्स्टॉल करा.

3. आता, आपल्या अ‍ॅप्लिकेशन मेनूमध्ये किंवा होम स्क्रीनवर आपल्याला एक हॉटस्टार अ‍ॅपचे चिन्ह दिसेल.

4. आपण आपल्या जीमेल किंवा फेसबुक अकाउंटने साइन इन करुन अ‍ॅप उघडू शकता किंवा आवश्यक तपशील प्रदान करून साइन अप करू शकता.

5. आता आपण लाईव्ह व्हिडिओ, क्रीडा स्पर्धा जसे की आयपीएल, टीव्ही शो, चित्रपट आणि बरेच काही पाहू शकता.

हॉटस्टार अ‍ॅपद्वारे आपण आजचा सामना लाइव्ह आपल्या मोबाईलवर पाहू शकता. आपण आपल्या फोनवर सहजपणे हा अ‍ॅप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता. आयपीएलचे सामने यंदा हॉटस्टार हिंदी, इंग्रजी, बंगाली, तमिळ, पंजाबी आणि मराठी अशा भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहे.

(The above story first appeared on LatestLY on Apr 19, 2021 04:26 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).