How to Download Hotstar & Watch KKR vs DC Live Match: कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील लाईव्ह सामना पाहण्यासाठी हॉटस्टार डाउनलोड कसे करावे? इथे पाहा

डियन प्रीमियर लीग 2020 मध्ये आज दोन सामने होणार आहेत. पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला जाईल. जर तांत्रिक अडणींनीमुळे तुम्हाला या लीगमधील सामने टीव्ही पाहता येत नसेल तर, आपण डिस्नी+ हॉटस्टार अ‍ॅप वर आयपीएल लाइव्ह पाहू शकतात. हॉटस्टार यावर्षी आयपीएलचा स्ट्रीमिंग पार्टनर आहे.

How to Download Hotstar & Watch KKR vs DC Live Match: कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील लाईव्ह सामना पाहण्यासाठी हॉटस्टार डाउनलोड कसे करावे? इथे पाहा
कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स (Photo Credit: File Image)

KKR vs DC 42nd IPL Match 2020: इंडियन प्रीमियर लीग 2020 (Indian Premier League) मध्ये आज दोन सामने होणार आहेत. पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यात खेळला जाईल. आयपीएलच्या 13व्या आवृत्तीचा हा 42वा सामना असेल. दिल्ली टीम सध्या दहापैकी सात सामने जिंकून गुणतालिकेच्या दुसर्‍या स्थानावर आहे, तर कोलकाता दहापैकी पाच सामने जिंकून चौथ्या क्रमांकावर आहे. यापूर्वीही दोन्ही संघांमध्ये झालेल्या सामन्यात दिल्लीने कोलकाताला 18 धावांनी पराभूत केले. कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आतापर्यंत 24 आयपीएल सामने झाले आहेत. कोलकाताने 13, तर दिल्लीने 11 विजय मिळविला आहे. 2019 चा एक सामना बरोबरीत सुटला होता आणि सुपर ओव्हरमध्ये दिल्लीने बाजी मारली होती. इयन मॉर्गनच्या नेतृत्वातील नाईट रायडर्स संघ प्ले-ऑफ शर्यतीत टिकून राहण्यासाठी आजच्या सामन्यात विजय मिळवून 2 गुण मिळवण्याच्या निर्धारित असतील. (KKR vs DC, IPL 2020 Live Streaming: कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील आयपीएल लाईव्ह सामना आणि स्कोर पाहा Hotstar आणि Star Network वर)

कोरोना व्हायरसचा वाढत प्रादुर्भाव लक्षात घेता क्रिकेट विश्वातील सर्वात लोकप्रिय टी-20 लीग आयपीएल यंदा भारताऐवजी युएईमध्ये खेळवली जात आहे. जर तांत्रिक अडणींनीमुळे तुम्हाला या लीगमधील सामने टीव्ही पाहता येत नसेल तर, चिंता करण्याची गरज नाही. आपण डिस्नी+ हॉटस्टार अ‍ॅप वर आयपीएल लाइव्ह पाहू शकतात. हॉटस्टार यावर्षी आयपीएलचा स्ट्रीमिंग पार्टनर आहे. अशा स्थितीत, डिस्नी+ हॉटस्टारवर कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात रंगणारा आजचा सामना देखील पाहता येणार आहे. हा सामना दुपारी 3.30 वाजेपासून लाईव्ह प्रक्षेपित केला जाईल.

पाहा हॉटस्टार डाउनलोड करण्याची पद्धत:

1. प्रथम, आपल्या मोबाईमधील इंटरनेट सुरु करा आणि प्ले- स्टोर उघडून हॉटस्टार ऍप शोधा.

2. यानंतर इन्स्टॉल ऑप्शनवर जाऊन हॉटस्टार ऍप आपल्या फोनमध्ये इन्स्टॉल करा.

3. इन्स्टॉल केल्यानंतर, आपल्या मोबाईलच्या मेनूमध्ये किंवा मुख्यपृष्ठावर हॉटस्टार अ‍ॅप चिन्ह दिसेल.

4. यानंतर आपण आपल्या जीमेल किंवा फेसबुक अकाउंटवरून साइन इन करून किंवा आवश्यक तपशील देऊन अ‍ॅप उघडू शकतात.

5. साइन इन होताच आपण लाईव्ह व्हिडिओ, क्रीडा टूर्नामेंट जसे की आयपीएल, टीव्ही मालिका, चित्रपट आणि बरेच काही हॉटस्टार वर पाहता येणार आहे.

हिंदी, इंग्रजी, बंगाली, तामिळ, पंजाबी अशा बर्‍याच भाषांमध्ये हॉटस्टार उपलब्ध आहे. टीव्ही मालिका, बातम्या, चित्रपट यासह हॉटस्टारवर 1 लाख तासांपर्यंतची व्हिडीओ कन्टेन्ट उपलब्ध आहे.

(The above story first appeared on LatestLY on Oct 24, 2020 01:45 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).