GT vs PBKS, IPL 2024 Head to Head: आयपीएलमध्ये गुजरात आणि पंजाबची एकमेकांविरुद्ध अशी आहे कामगिरी, येथे पाहा आश्चर्यकारक आकडेवारी
त्याचबरोबर गुजरातला हा सामना जिंकून गुणतालिकेत आपले स्थान सुधारायचे आहे. सध्या गुणतालिकेत गुजरात पाचव्या तर पंजाब सातव्या स्थानावर आहे.
GT vs PBKS, IPL 2024: आयपीएल 2024 च्या 17 व्या (IPL 2024) सामन्यात गुजरात टायटन्स संघ पंजाब किंग्जशी (GT vs PBKS) भिडणार आहे. पंजाब संघाला हा सामना कोणत्याही किंमतीत जिंकायचा आहे. त्याचबरोबर गुजरातला हा सामना जिंकून गुणतालिकेत आपले स्थान सुधारायचे आहे. सध्या गुणतालिकेत गुजरात पाचव्या तर पंजाब सातव्या स्थानावर आहे. हा सामना जिंकण्यासाठी दोन्ही संघ सर्वतोपरी प्रयत्न करणार आहेत. आजच्या सामन्यात धवन आणि गिलची कर्णधारपदाची रोमांचक शैलीही चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. (हे देखील वाचा: GT vs PBKS, IPL 2024 17th Match Live Streaming: आज गुजरात आणि पंजाब यांच्यात होणार हाय व्होल्टेज सामना, जाणून घ्या कधी अन् कुठे घेणार सामन्याचा आनंद)
पाहा दोन्ही संघाची आकडेवारी
आयपीएलमध्ये गुजरात आणि पंजाब 3 सामन्यात आमनेसामने आले आहेत. या 3 सामन्यांमध्ये गुजरातने 2 तर पंजाबने 1 वेळा विजय मिळवला आहे. गेल्या वर्षी आयपीएलमध्ये गुजरात आणि पंजाब आमनेसामने आले होते, तेव्हा गुजरातने 6 गडी राखून विजय मिळवला होता.
दोन्ही संघाची संभाव्य प्लेइंग 11
पंजाब: शुभमन गिल (कर्णधार), रिद्धिमान साहा (विकेटकीपर), साई सुदर्शन, अजमतुल्ला उमरझाई, डेव्हिड मिलर, विजय शंकर, राहुल तेवतिया, रशीद खान, नूर अहमद, उमेश यादव, दर्शन नळकांडे.
गुजरात: शिखर धवन (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, प्रभसिमरन सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम कुरान, शशांक सिंग, हर्षल पटेल, हरपीत ब्रार, कागिसो रबाडा, राहुल चहर.