IPL 2024 Last Chance Five Players: असे पाच भारतीय खेळाडू ज्यांच्यां बुडत्या कारकिर्दीला आयपीएलमध्ये मिळू शकते शेवटची संधी, जाणून घ्या कोण आहे ते
त्याचबरोबर असे काही खेळाडूही पाहायला मिळणार आहेत, ज्यांच्या बुडत्या कारकिर्दीला या मोसमातून साथ मिळण्याची अपेक्षा आहे.
IPL 2024: शुक्रवार 22 मार्चपासून आयपीएलचा 17वा हंगाम (IPL 2024) सुरू होत आहे. पहिलाच सामना आरसीबी आणि सीएसके आमनेसामने (RCB vs CSK) येणार आहेत. या मोसमात अनेक युवा खेळाडू पदार्पण करतील आणि धमाल करताना दिसतील. त्याचबरोबर असे काही खेळाडूही पाहायला मिळणार आहेत, ज्यांच्या बुडत्या कारकिर्दीला या मोसमातून साथ मिळण्याची अपेक्षा आहे. या यादीत, आम्ही अशा पाच भारतीय खेळाडूंबद्दल बोलत आहोत जे प्रतिभेने समृद्ध आहेत परंतु सध्या त्यांच्या फॉर्ममुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे टीम इंडियापासून दूर आहेत. (हे देखील वाचा: Captains of All Teams for IPL 2024: जगातील सर्वात मोठ्या टी-20 लीगला शुक्रवार पासुन होणार सुरुवात, त्या आधी पाहून घ्या सर्व 10 संघाचे कर्णधार)
1. इशान किशन (Ishan Kishan)
भारतीय संघाकडून तिन्ही फॉरमॅट खेळणाऱ्या इशान किशनने दक्षिण आफ्रिका दौऱ्यात अचानक नाव मागे घेत स्वत:च्या पायावर दगड मारुन घेतला. यानंतर त्याने रणजी ट्रॉफी खेळण्याच्या संघ व्यवस्थापनाच्या आदेशाकडे वारंवार दुर्लक्ष केले. यानंतर त्यांना केंद्रीय करारही गमवावा लागला होता. आता त्याला आगामी आयपीएल हंगामात आपली बुडणारी कारकीर्द वाचवायची आहे. आयपीएलनंतर लगेचच विश्वचषक देखील आहे आणि जर त्यांला पुन्हा संघात यायचे असेल तर त्याला येथे चमकदार कामगिरी करावी लागेल.
2. श्रेयस अय्यर (Shryas Iyer)
भारतीय फलंदाज श्रेयस अय्यरची कथाही अशीच आहे. पण त्याच्या फिटनेसचा मुद्दा आणि फ्लॉप कामगिरी त्याच्यासाठी समस्या बनली आहे. फिटनेसमुळे अय्यरला इंग्लंड मालिकेतून मध्यंतरी बाहेर पडावे लागले. रणजी ट्रॉफीच्या फायनलमध्ये त्याने 95 धावा केल्या असल्या तरी टीम इंडियासाठी त्याच्या काही कमकुवतपणा सातत्याने समोर येत आहेत. टीम मॅनेजमेंटही कदाचित त्याच्यावर नाराज असल्याचं अनेक रिपोर्ट्समधून समोर आलं होतं. त्याला केंद्रीय करारही गमावावा लागला. आता आयपीएल 2024 मध्ये, तो केकेआर साठी चमकदार कामगिरी करून टी-20 विश्वचषक 2024 साठी दार ठोठवू शकतो.
3. पृथ्वी शॉ (Prithvi Shaw)
भारतीय संघात शानदार पदार्पण करणाऱ्या पृथ्वी शॉची तुलना एकेकाळी ब्रायन लारा आणि सचिन तेंडुलकरसारख्या खेळाडूंशी केली जात होती. पण आता तो बऱ्याच दिवसांपासून टीम इंडियाच्या बाहेर आहे आणि सध्या तरी त्याची जागा स्पष्ट दिसत नाहीये. देशांतर्गत क्रिकेटमध्येही त्याची कामगिरी संमिश्र राहिली आणि विशेष काही नाही. अशा परिस्थितीत त्यालाही या आयपीएलमध्ये स्वत:ला सिद्ध करण्याची चांगली संधी मिळू शकते. गेल्या वर्षीही तो आयपीएलमध्ये चांगलाच फ्लॉप झाला होता.
4. उमरान मलिक (Umran Malik)
आयपीएल 2021 आणि 2022 मध्ये आपला वेग दाखवणारा उमरान मलिक अचानक गायब झाला आहे. एक काळ असा होता जेव्हा त्याला टीम इंडियासाठी वनडे आणि टी-20 मध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. पण आता तो अचानक बेपत्ता आहे. त्याला टीम इंडियाचा स्पीडस्टर म्हटलं जातं. गेल्या आयपीएलमध्येही तो काही विशेष करू शकला नाही आणि तो बराच काळ टीम इंडियातून बाहेर आहे. अशा स्थितीत आगामी आयपीएल मोसमात आपली बुडणारी कारकीर्द वाचवण्याची सुवर्णसंधीही त्याच्याकडे असेल.
5. भुवनेश्वर कुमार (Bhuvneswar Kumar)
टी-20 विश्वचषक 2022 नंतर टीम इंडियातून बाहेर असलेला सीनियर गोलंदाज भुवनेश्वर कुमारच्या पुनरागमनाची कोणतीही आशा दिसत नाही. काही काळापासून तो आयपीएलमध्येही कामगिरी करू शकलेला नाही. तोही टीम इंडियातून बाहेर आहे. अशा परिस्थितीत आपली बुडणारी कारकीर्द वाचवण्याची ही शेवटची संधी असू शकते. तो टीम इंडियात नाही आणि आयपीएलमध्येही कामगिरी चांगली करू शकला नाही