SL vs PAK, Asia Cup Final 2022: पाकिस्तानला धूळ चारत श्रीलंका ठरला आशिया कपचा विजेता, हसरंगाने एका षटकात घेतले 3 बळी

यापूर्वी या दोघांमध्ये तीनवेळा खेळल्या गेलेल्या अंतिम फेरीत श्रीलंकेने दोनदा तर पाकिस्तानने एकदा विजय मिळवला होता.

Photo Credit - Twitter

श्रीलंकेने आशिया चषक 2022 च्या विजेतेपदाचा (Sri Lanka Win Asia Cup 2022) सामना पाकिस्तानवर 23 धावांनी जिंकला. यासह श्रीलंकेने सहाव्यांदा आशिया कप ट्रॉफी जिंकली आहे. श्रीलंकेने रविवारी पाकिस्तानविरुद्धच्या आशिया कप फायनलमध्ये प्रथम फलंदाजी करताना 6 बाद 170 धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ 20 षटकांत सर्व गड्यांच्या मोबदल्यात 147 धावाच करू शकला. श्रीलंकेसाठी भानुका राजपक्षेने 41 चेंडूत नाबाद 71 आणि वानिंदू हसरंगाने 36 धावा केल्या. पाकिस्तानकडून हॅरिस रौफने तीन बळी घेतले. पाकिस्तानकडून मोहम्मद रिझवानने सर्वाधिक 51 धावा केल्या. श्रीलंकेकडून प्रमोद मदुशनने 4, हसरंगाने 3 आणि चमिकाने 2 गडी बाद केले. आशिया कपच्या इतिहासात चौथ्यांदा जेतेपदाच्या लढतीत श्रीलंका आणि पाकिस्तानचे संघ आमनेसामने आले होते. यापूर्वी या दोघांमध्ये तीनवेळा खेळल्या गेलेल्या अंतिम फेरीत श्रीलंकेने दोनदा तर पाकिस्तानने एकदा विजय मिळवला होता.

श्रीलंकेने 1986 मध्ये पहिल्यांदा आशिया कप जिंकला होता. यानंतर संघाने 1997, 2004, 2008, 2014 आणि आता 2022 मध्ये विजेतेपद पटकावले आहे. भारताने हे विजेतेपद सर्वाधिक वेळा जिंकले आहे. श्रीलंका आता त्यांच्यापासून फक्त एक विजेतेपद दूर आहे. (हे देखील वाचा: Saqlain Mushtaq On Virat Kohli: 'विराट माझ्या हृदयाच्या खूप जवळ आहे', बाबरशी तुलना करत पाकिस्तानी प्रशिक्षकाने केले मोठे वक्तव्य)

एप्रिल 2014 नंतर श्रीलंकेने सलग पाच T20 सामने जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे. याआधी, 2014 मध्ये बांगलादेशमध्ये खेळल्या गेलेल्या T20 विश्वचषक स्पर्धेत संघाने सलग पाच टी-20 सामने जिंकले होते.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif