SRH vs GT, TATA IPL 2025 19th Match Stats And Preview: सनरायझर्स हैदराबादला हरवून गुजरात टायटन्स साधणार विजयाची 'हॅटट्रिक', आजच्या सामन्यात होऊ शकतात हे अनोखे विक्रम
या हंगामात हैदराबादने आतापर्यंत 4 सामने खेळले असुन एकच सामना जिंकला आहे. याशिवाय, ते पॉइंट टेबलमध्ये तळाशी आहे. दुसरीकडे, गुजरात टायटन्सने आतापर्यंत तीन सामने खेळले असुन एका सामन्यात पराभव पत्कारावा लागला आहे. अशा परिस्थितीत आजचा सामना रोमांचक पाहायला मिळू शकतो.
Sunrisers Hyderabad vs Gujarat Titans, 19th Match: टाटा आयपीएल 2025 चा (TATA IPL 2025) 19 वा (Indian Premier League 2025) सामना आज सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स (SRH vs GT) यांच्यात हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर (Rajiv Gandhi International Stadium, Hyderabad) संध्याकाळी 7.30 वाजता खेळला जाईल. सनरायझर्स हैदराबादची कमान पॅट कमिन्सच्या खांद्यावर आहे, तर गुजरात टायटन्सचे नेतृत्व शुभमन गिलकडे आहे. या हंगामात हैदराबादने आतापर्यंत 4 सामने खेळले असुन एकच सामना जिंकला आहे. याशिवाय, ते पॉइंट टेबलमध्ये तळाशी आहे. दुसरीकडे, गुजरात टायटन्सने आतापर्यंत तीन सामने खेळले असुन एका सामन्यात पराभव पत्कारावा लागला आहे. अशा परिस्थितीत आजचा सामना रोमांचक पाहायला मिळू शकतो.
हेड टू हेड रेकॉर्ड (SRH vs GT Head to Head)
आयपीएलच्या इतिहासात सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स यांच्यात एकूण पाच सामने खेळले गेले आहेत. या काळात, गुजरात टायटन्सने वरचढ कामगिरी केली आहे. गुजरात टायटन्स संघाने तीन सामने जिंकले आहेत. तर, सनरायझर्स हैदराबादने फक्त एकच सामना जिंकला आहे. त्याच वेळी, एका सामन्यात कोणताही निकाल मिळू शकला नाही. या हंगामात दोन्ही संघांमधील ही पहिलीच लढत असेल. आयपीएलच्या गेल्या हंगामात दोन्ही संघांमध्ये दोन सामने खेळले गेले होते. पहिला सामना पावसामुळे रद्द झाला. दुसऱ्या सामन्यात गुजरात टायटन्स संघाने 7 विकेट्सने विजय मिळवला. सनरायझर्स हैदराबादला यावेळी पुनरागमन करायचे आहे.
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर दोन्ही संघांची कामगिरी
आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत राजीव गांधी स्टेडियममध्ये एकूण 79 सामने खेळले गेले आहेत. या काळात, प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 35 सामने जिंकले आहेत, तर दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघाने 44 सामने जिंकले आहेत. या मैदानावर दोन्ही संघांमध्ये फक्त एकच सामना खेळला गेला आहे. पावसामुळे तो रद्द करण्यात आला आहे.
आजच्या सामन्यात होऊ शकतात 'हे' मोठे विक्रम
सनरायझर्स हैदराबादचा स्फोटक सलामीवीर ट्रॅव्हिस हेडला आयपीएलमध्ये एक हजार धावा पूर्ण करण्यासाठी 88 धावांची आवश्यकता आहे.
सनरायझर्स हैदराबादचा स्टार वेगवान गोलंदाज हर्षल पटेलला टी-20 क्रिकेटमध्ये 250 बळी पूर्ण करण्यासाठी दोन विकेट्सची आवश्यकता आहे.
सनरायझर्स हैदराबादचा स्टार वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट टी-20 क्रिकेटमधील त्याचा 200 वा सामना खेळण्यासाठी सज्ज झाला आहे.
गुजरात टायटन्सचा घातक वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला आयपीएलमध्ये 100 विकेट्स पूर्ण करण्यासाठी दोन विकेट्सची आवश्यकता आहे.
(The above story first appeared on LatestLY on Apr 06, 2025 06:54 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

