GT vs RR, TATA IPL 2025 23rd Match Live Score Update: गुजरातने राजस्थानला दिले 218 धावांचे लक्ष्य, सुदर्शनने खेळली 82 धावांची शानदार खेळी
गुजरातचे नेतृत्व शुभमन गिल (Shubman Gill) करत आहे. तर, राजस्थानचे नेतृत्व संजू सॅमसनकडे (Sanju Samson) आहे. दरम्यान, राजस्थान राॅयल्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या गुजरातने राजस्थानसमोर 218 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
Gujarat Titans vs Rajasthan Royals IPL 2025 23rd Match: आयपीएल 2025 (Indian Premier League 2025) चा 23 वा सामना आज गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स (GT vs RR) यांच्यात अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium, Ahmedabad) खेळला जात आहे. गुजरातचे नेतृत्व शुभमन गिल (Shubman Gill) करत आहे. तर, राजस्थानचे नेतृत्व संजू सॅमसनकडे (Sanju Samson) आहे. दरम्यान, राजस्थान राॅयल्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या गुजरातने राजस्थानसमोर 218 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
साई सुदर्शनची 82 धावांची शानदार खेळी
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या गुजरातने 20 षटकात 6 गडी गमावून 217 धावा केल्या. गुजरातकडून साई सुदर्शनने 82 धावांची सर्वाधिक खेळी केली. त्याने 53 चेंडूत 8 चौकार आणि 3 षटकार मारले. त्याच्याशिवाय जोस बटलर आणि शाहरुख खानने प्रत्येकी 36-36 धावांचे योगदान दिले. गुजरातला हा सामना जिंकण्यासाठी 218 धावा करायच्या आहेत.
देशपांडे आणि थीकशनाने घेतल्या प्रत्येकी 2 विकेट
दुसरीकडे, तुषार देशपांडेने राजस्थान राॅयल्स संघाला पहिले मोठे यश मिळवून दिले. राजस्थान राॅयल्स संघाकडून गोलंदाजीत तुषार देशपांडे आणि महेश थीकशना यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. दोन्ही संघांना हा सामना जिंकून स्पर्धेत दोन गुण मिळवायचे आहेत.