Gautam Gambhir on Virat Kohli Captaincy: 'आठ वर्षांचा कालावधी मोठा, RCB ने विराट कोहलीच्या पुढे विचार करावा', IPL एक्सिटनंतर गौतम गंभीरने साधला निशाणा
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर पुन्हा इंडियन प्रीमियर लीगचे पहिले विजेतेपद मिळवण्याच्या प्रयत्नात पुन्हा अपयशी ठरले ज्यामुळे कर्णधार विराट कोहलीवर कडक टीकेला सामोरे जावे लागत आहे. गौतम गंभीरने आरसीबीच्या हैदराबादविरुद्ध पराभवानंतर कोहलीच्या कर्णधारपदाविषयी बोलताना ते म्हणाले की, 32 वर्षीय फलंदाजाने पुढे येऊन जबाबदारी स्वीकारावी.
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) पुन्हा इंडियन प्रीमियर लीगचे (Indian Premier League) पहिले विजेतेपद मिळवण्याच्या प्रयत्नात पुन्हा अपयशी ठरले. सनरायझर्स हैदराबादविरुद्ध (Sunrisers Hyderabad) शुक्रवार, 6 नोव्हेंबर रोजी झालेल्या एलिमिनेटर सामन्यात आरसीबीला (RCB) हैदराबादविरुद्ध 6 विकेटने पराभव पत्करावा लागला आणि त्यांचे पहिल्या आयपीएल विजेतेपदाची स्वप्न भंगले. आरसीबीने सुरुवातीला प्रभावित केले परंतु शेवटच्या पाच सामन्यात ते गती मिळवण्यात अपयशी ठरले. अगदी थोड्याफार फरकाने त्यांनी प्ले ऑफसाठी क्वालिफाय केले. इतकंच नाही तर साखळी सामन्यात त्यांनी मागील पाचही सामने गमावले. आयपीएल 2020मध्ये तरी ते यंदा आपले पहिले विजेतेपद जिंकतील असे दिसत होते, मात्र त्यांनी यंदा पुन्हा निराश केले ज्यामुळे कर्णधार विराट कोहलीवर (Virat Kohli) कडक टीकेला सामोरे जावे लागत आहे. (IPL 2020 Eliminator: आज नही मार राहा शॉट? विराट कोहलीने मनीष पांडेला केले स्लेज, SRH फलंदाजाने षटकार लगावत RCB कर्णधाराला चपराक लगावली Watch Video)
भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज आणि दोन वेळा आयपीएलचा विजयी कर्णधार गौतम गंभीरने आरसीबीच्या हैदराबादविरुद्ध पराभवानंतर कोहलीच्या कर्णधारपदाविषयी बोलताना ते म्हणाले की, 32 वर्षीय फलंदाजाने पुढे येऊन जबाबदारी स्वीकारावी. पुढे ते म्हणाले की, आरसीबीने आता कोहलीच्या पुढे जाऊन विचार करावा. “100% कारण समस्या उत्तरदायित्वाची आहे. स्पर्धेत आठ वर्षे [ट्रॉफीशिवाय] मोठा कालावधी आहे. मला इतर कुठल्याही कर्णधार सांगा... कर्णधार विसरा, आठ वर्षे मिळाली असती आणि जेतेपद जिंकले नसते असा कोणताही दुसरा खेळाडू मला सांगा आणि तरीही त्याला कायम ठेवले आहे. तर ती उत्तरदायित्व असण्याची गरज आहे. एका कर्णधाराला जबाबदारी घ्यावी लागेल,” गंभीरने ईएसपीएनक्रिकइन्फोला सांगितले.
गंभीरने पुढे म्हटले की, “विराट कोहलीविरूद्ध माझ्या मनात काही नाही पण कोठेतरी त्याने आपला हात वर घेऊन बोलण्याची गरज आहे,‘ हो, मी जबाबदार आहे.’ आठ वर्ष एक कालावधी आहे. आर अश्विनचे काय झाले ते पहा. किंग्ज इलेव्हन पंजाबसाठी दोन वर्षे कर्णधारपद सांभाळणे त्यांना शक्य झाले नाही आणि त्याला काढून टाकले गेले. आम्ही एमएस धोनीबद्दल बोलतो, आम्ही रोहित शर्माबद्दल बोलतो, आम्ही विराट कोहलीबद्दल बोलतो ... मुळीच नाही. धोनीने तीन आयपीएल जेतेपद जिंकले आहेत, रोहित शर्माने चार जिंकली आहेत आणि त्यांनी इतके दिवस कर्णधारपद सांभाळले आहे कारण त्यांनी परिणाम आणले आहेत. मला खात्री आहे की जर रोहितने आठ वर्ष परिणाम आणले नसते तर त्यालाही काढले गेले असते. वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळे यार्डस्टीक नसावेत. समस्या व उत्तरदायित्व वरून सुरू होते, व्यवस्थापन किंवा सहाय्यक कर्मचार्यांकडून नव्हे तर नेत्यांकडून. आपण नेता आहात, आपण कर्णधार आहात. जेव्हा आपल्याला क्रेडिट मिळते तेव्हा आपल्याला टीकेला देखील सामोरे जावे लागते.”
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)