Gautam Gambhir on Virat Kohli: टी-20 मध्ये रोहित, गेल आणि एबीडीपेक्षा विराट कोहली चांगला, गौतम गंभीरने स्पष्ट केले कारण

दुसरीकडे, मर्यादित षटकांत सातत्यपूर्ण कामगिरी करणे आणि सतत धावा करणे हीच गोष्ट असेल तर त्यात विराट कोहलीचा कोणी सामना करू शकत नाही, असा विश्वास टीम इंडियाचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने व्यक्त केला आहे.

गौतम गंभीर, विराट कोहली (Photo Credit: Getty)

क्रिस गेल, रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि एबी डिव्हिलियर्सचा (AB de Villiers) मर्यादित षटकांच्या स्वरूपात सर्वोत्तम फलंदाजांच्या यादीत समावेश केला जातो. दुसरीकडे, मर्यादित षटकांत सातत्यपूर्ण कामगिरी करणे आणि सतत धावा करणे हीच गोष्ट असेल तर त्यात विराट कोहलीचा (Virat Kohli) कोणी सामना करू शकत नाही, असा विश्वास टीम इंडियाचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने (Gautam Gambhir) व्यक्त केला आहे. मर्यादित षटकांच्या स्वरूपात गंभीरने विराटच्या फलंदाजीचे कौतुक केले आणि विराट या तिघांपेक्षा वेगळा कसा आहे ते सांगितले. स्टार स्पोर्ट्स 'क्रिकेट कनेक्ट' शोमध्ये गंभीरने सांगितले की मर्यादित षटकांत रोहित शर्मापेक्षा विराट कसा चांगला फलंदाज आहे. तो म्हणाला, "यामुळे विराट बाकींच्यापेक्षा वेगळा आहे. तुम्ही रोहितकडे पाहा, त्याच्याकडे विराटचा दर्जा नाही. तो विराटसारखा स्ट्राइक रोटेट नाहीत. रोहितकडे मोठे शॉट्स आहेत पण हेच कारण आहे की कोहली रोहितपेक्षा सातत्यपूर्ण आहे. गेलमध्येही स्ट्राइक रोटेटसारखे काही नाही, डिव्हिलियर्सही फिरकी गोलंदाजांविरूद्ध स्ट्राइक रोटेट करू शकत नाही, विराट करतो त्यामुळे त्याची सरासरी 50 च्या वर आहे." (विराट कोहलीच्या Ex-गर्लफ्रेंडसोबत बोलला इंग्लंडचा क्रिकेटपटू, संपूर्ण सामन्यात टोमणे मारून टीम इंडिया कॅप्टनने केले हैराण)

आयसीसी टी -20 आंतरराष्ट्रीय फलंदाजांच्या क्रमवारीत विराट 10 व्या स्थानावर आहे, तर पाकिस्तानचा बाबर आझम अव्वल क्रमांकावर आहे. बाबर आणि विराट हे दोघे क्रिकेटच्या तीनही प्रकारांमध्ये सरासरी 50 च्या वर असणारे फलंदाज आहेत. गंभीर म्हणाले, "डॉट बॉलला लोक जास्त महत्त्व देत नाहीत, पण जर तुम्ही कमी डॉट बॉल खेळत असाल तर तुम्ही दबाव कमी करू शकता. क्रिकेटमध्ये षटकार आणि चौकार मारणे ही सर्वात सोपी गोष्ट आहे. कारण आपण ते उच्च-जोखीमचे शॉट्स खेळता. ते ठीक झाल्यास सर्वांनाच आवडते, परंतु जर ते चुकले तर आपल्याला माघारी परतावे लागते. क्रिकेटमध्ये असे बरेच कमी खेळाडू आहेत जे प्रत्येक चेंडूवर एक धाव घेऊ शकतात. विराट कोहली हे उत्तम प्रकारे करतो."

दुसरीकडे, गंभीरने विराटच्या नेतृत्वशैलीवर टीका केली आणि म्हणाला, “तुम्ही स्वतःसाठी धावा काढणं सुरु ठेवू शकता. पण भरपूर धावा करुनही संघाला महत्वाची स्पर्धा जिंकवून न देऊ शकलेले अनेक खेळाडू तुम्हाला सापडतील. सध्याच्या घडीला विराट कोहलीने कर्णधार म्हणून अद्याप काहीही साध्य केलेलं नाही. त्याला खूप शिकायची गरज आहे. तो धावा काढेल, शतकं ठोकेल, हे सारं सुरु राहिलं; पण क्रिकेटमध्ये जोपर्यंत तुम्ही कर्णधार म्हणून महत्वाच्या स्पर्धा जिंकत नाहीत, तोवर तुमच्या कारकिर्दीला फारसा अर्थ उरत नाही.”