माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू अब्दुल रज्जाक यांची धक्कादायक कबुली, लग्नानंतर 5-6 मुलींसह अवैध संबंधांचा बायकोसमोर केला खुलासा, पहा (Video)
पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू अब्दुल रज्जाकने एका टीव्ही शो दरम्यान, रझाक यांनी विवाह बाहेर आपले 5-6 अनैतिक संबंध असल्याची त्याने कबुली दिली आणि म्हणाला की त्यातील एक संबंध एक वर्षापेक्षा जास्त काळ टिकला होता.
पाकिस्तान (Pakistan) चा माजी क्रिकेटपटू अब्दुल रज्जाक (Abdul Razzaq) यांने विश्वचषक दरम्यान आपल्या विधानांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. भारतीय संघाने (Indian Team) इंग्लंड (England) विरुद्धचा सामना मुद्दाम ठरल्याचे बोलत रझाक यांनी त्या सामन्याला हिंदू-मुस्लिम रंग दिला. पाकिस्तान क्वालिफाय करून नये म्हणून भारत मुद्दाम इंग्लंडविरुद्ध पराभूत झाला. रझाक यांनी अन्य गोलंदाजनांची टीका केली पण मोहम्मद शमी याचे कौतुक केले आणि त्याचा धर्मच काढला. "शमी आपलं काम करत आहे. तो मुसलमान आहे ही चांगली गोष्ट आहे. जरी तो भारताकडून खेळत असला तरी,' असं वादग्रस्त वक्तव्य रज्जाकने केले. पण यंदा तर रझाक यांनी पातळीचं सोडली. एका टीव्ही शो दरम्यान, रझाक यांनी विवाह बाहेर आपले 5-6 अनैतिक संबंध असल्याची त्याने कबुली दिली आणि म्हणाला की त्यातील एक संबंध एक वर्षापेक्षा जास्त काळ टिकला होता. त्याचबरोबर ही अफेअर्स दोन्ही बाजूने झाली, ती एकतर्फी नव्हे असे रझ्झाक यांनी बायको समोर काबुल केले. (ICC World Cup 2019: पाकिस्तान च्या अब्दुल रज्जाक ने केली हार्दिक पांड्या च्या फलंदाजी वर टीका, 2 आठवड्यात 'जगातील सर्वोत्तम ऑल राउंडर' बनविण्याची दिली ऑफर)
दरम्यान, रज्जाकच्या या वक्तव्याचा एक विडिओ सोशल मीडियावर वायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रझाक म्हणाला, "हे सर्व माझ्या लग्नानंतर सुरु झाले. आपल्या काळात रझाक हे क्रिकेट विश्वातील एक प्रमुख नाव होते आणि ते उत्कृष्ट अष्टपैलूंपैकी ही एक मानले जायचे. रझाक यांनी पाकिस्तानसाठी 265 वनडे सामने खेळले आहे ज्यात त्यांनी 5,080 धावा केल्या आहे. यात 3 शतक आणि 23 अर्धशतकांचा समावेश आहे. शिवाय त्यांनी 269 विकेट्स देखील घेतल्या आहे. पहा रज्जाक यांचा वायरल व्हिडिओ:
दुसरीकडे, विश्वचषक दरम्यान, रज्जाकनी भारतीय अष्टपैलू हार्दिक पंड्या (Hardik Pandya) च्या कामगिरीवर वक्तव्य करत म्हणाले की, पंड्याच्या खेळीमध्ये काही कमतरता जाणवते. रज्जाकने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत म्हटलं की, 'मी 2 आठवड्यात हार्दिक पंड्याला जगातील सर्वात सर्वश्रेष्ठ ऑलराउंडर बनवू शकतो.'