IPL Auction 2025 Live

पाकिस्तान, वेस्ट इंडिजविरुद्ध कर पण ऑस्ट्रेलियाविरुद्ध नको! ब्रेट ली ने रोहित शर्माकडे केली स्पेशल विनंती

याची काळजी घेत ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट लीने 'हिटमॅन'कडे स्पेशल विनंती केली. स्टार स्पोर्ट्सच्या शो ‘क्रिकेट कनेक्ट’मध्ये ली म्हणाला, “तो पुष्कळ दुहेरी शतक ठोकेल अशी अशा आहे. कृपया ऑस्ट्रेलियाविरूद्ध आणखी काही नाही...”

रोहित शर्मा, ब्रेट ली (Photo Credit: Getty)

न्यूझीलंड दौऱ्यावर अखेरचा सामना खेळलेला भारतीय संघाचा (Indian Team) सलामी फलंदाज रोहित शर्मा (Rohit Sharma) क्रिकेट मैदानावर पुनरागमन करण्यास आतुर आहे. रोहितला न्यूझीलंडविरुद्ध अखेरच्या टी-20 सामन्यात दुखापत झाली होती त्यानंतर त्याला किवी दौऱ्यावर वनडे आणि टेस्ट मालिकेला मुकावे लागले होते. मधल्याफळीत कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या रोहितने 2013 मध्ये पहिल्यांदा सलामी फलंदाज म्हणून करिअर सुरु केले. मर्यादित ओव्हरमध्ये यशस्वी सलामी फलंदाज म्हणून रोहितचा उल्लेख केला जातो. आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमध्ये तीन दुहेरी शतकं ठोकणारा रोहित एकमेव फलंदाज आहे. 2013 मध्ये रोहितने ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) पाहिलं वनडे दुहेरी शतक ठोकलं होतं. दुखापत आणि त्यानंतर कोरोनामुळे खेळापासून दूर राहिलेला रोहित कमबॅकसाठी प्रयत्न करत आहे. रोहित खेळ सुरु होताच मैदानावर परतल्यावर फटकेबाजी करेल आणि याची काळजी घेत ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली (Brett Lee) याने 'हिटमॅन'कडे स्पेशल विनंती केली आहे. (एमएस धोनी याच्या एका निर्णयाने बदलला रोहित शर्मा याचा करिअर, 2013 चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये मिळाली होती दुसरी संधी)

स्टार स्पोर्ट्सच्या शो ‘क्रिकेट कनेक्ट’मध्ये ली म्हणाला, “तो पुष्कळ दुहेरी शतक ठोकेल अशी अशा आहे. कृपया ऑस्ट्रेलियाविरूद्ध आणखी काही नाही... इतर कोणताही देश, पाकिस्तान, वेस्ट इंडिज उत्तम परंतु ऑस्ट्रेलियाविरुद्ध नाही.” रोहितने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2013 वनडे सामन्यात 209 धावांची तुफान खेळी केली आणि सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सहवागनंतर वनडेमध्ये तिहेरी शतक करणारा तिसरा भारतीय फलंदाज बनला. वर्षानंतर रोहितने वनडेमधील फलंदाजी पूर्णपणे वेगळ्या पातळीवर नेली आणि 2014 मध्ये कोलकाताच्या ईडन गार्डन्स येथे श्रीलंकेविरुद्ध 264 धावा ठोकल्या. प्रत्युत्तरात पूर्ण श्रीलंका संघ रोहितच्या वैयक्तिक 264 धावांच्या 13 धावा कमी 251 स्कोरवर बाद झाले.

2017 मध्ये मोहालीच्या पीसीएए स्टेडियमवर भारतीय सलामी फलंदाजाने आपले तिसरे द्विशतक झळकावले होते आणि श्रीलंकेला बॅकफूटवर ठकलले. मागील वर्षी रोहितने 2019 मध्ये वनडे वर्ल्ड कपमध्ये पाच शतकं झळकावले आणि एकाच वर्ल्ड कप आवृत्तीत सर्वाधिक शतकं ठोकण्याचा विश्वचषक विक्रम मोडला होता. दरम्यान, सध्या कोविड-19 लॉकडाउनमुळे रोहितच्या फिटनेस टेस्ट लांबणीवर गेला आहे. त्याला फिटनेस टेस्टसाठी अजून काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.