ICC ODI Ranking: पहिली वनडे हरल्यानंतरही टीम इंडिया आयसीसी क्रमवारीत बनू शकते नंबर वन, फक्त करावे लागेल हे काम

पण मालिकेतील उर्वरित दोन एकदिवसीय सामने जिंकून भारतीय संघ किवी संघाला क्रमवारीत मागे सोडू शकतो.

Team India (Photo Credit - Twitter)

IND vs NZ 2nd ODI 2022: शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघ न्यूझीलंडविरुद्धच्या 3 सामन्यांच्या मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना (IND vs NZ) गमावल्यानंतरही आयसीसी क्रमवारीत (ICC ODI Ranking) पहिल्या क्रमांकावर पोहोचू शकतो. पहिल्या एकदिवसीय सामन्यात पाहुण्या भारताचा पराभव करून यजमान न्यूझीलंड संघ 116 रेटिंग गुणांसह आयसीसी वनडे क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे. पण मालिकेतील उर्वरित दोन एकदिवसीय सामने जिंकून भारतीय संघ किवी संघाला क्रमवारीत मागे सोडू शकतो. त्यानंतर टीम इंडिया 114 गुणांसह पहिल्या क्रमांकावर पोहोचेल.

भारत सध्या 110 रेटिंग गुणांसह चौथ्या क्रमांकावर 

केन विल्यमसनच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंड संघ हॅमिल्टन आणि क्राइस्टचर्च वनडे हरला तर त्याचे रेटिंग गुण घसरतील. टीम इंडिया सध्या 110 रेटिंग गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. या मालिकेतील उर्वरित दोन सामने जिंकून शिखर धवन आणि कंपनी 114 गुणांसह अव्वल स्थानावर पोहोचेल. सलग दोन एकदिवसीय सामने गमावल्यानंतर न्यूझीलंड संघाला 112 रेटिंग गुण मिळतील. अशा स्थितीत भारतीय संघ पहिल्या क्रमांकावर बसेल. (हे देखील वाचा: Rishabh Pant ला मिळत असलेल्या संधींवर मिळू शकतो ब्रेक, माजी दिग्गजाने केलं मोठं विधान)

टीम इंडियाला जिंकून मालिकेत बरोबरी साधायची 

दुसरीकडे, किवी संघ हॅमिल्टन वनडे जिंकून भारताच्या आशा नष्ट करू शकतो. ऑकलंडमध्ये खेळल्या गेलेल्या मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडने भारताचा 7 गडी राखून पराभव करत 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. भारतीय गोलंदाज 306 धावांचा बचाव करण्यात अपयशी ठरले. हॅमिल्टनमध्ये विजयाची नोंद करून भारतीय संघ मालिकेत बरोबरी साधण्याचा तसेच वनडे क्रमवारीत नंबर वन होण्याच्या आशा जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करेल.



संबंधित बातम्या

Central Railway: मध्य रेल्वेच्या 14 स्थानकांवर 5 दिवसांसाठी प्लॅटफॉर्म तिकीट बंदी; वर्ष अखेरीस गर्दी टाळण्यासाठी घेतला निर्णय

Australia vs India 4th Test Day 4 Preview: टीम इंडिया चौथ्या दिवशी सामन्यात पुनरागमन करणार की ऑस्ट्रेलीयन गोलंदाज मोठा पलटवार करणार? खेळपट्टी अहवाल, मिनी लढाई आणि लाइव्ह स्ट्रीमिंगसह सर्व माहिती जाणून घ्या

India vs England T20I Series 2024: टीम इंडिया आणि इंग्लंडमध्ये 22 जानेवारीपासून टी 20 आंतरराष्ट्रीय मालिका खेळली जाणार; जाणून घ्या सर्व सामने कधी आणि कुठे खेळले जाणार?

New Zealand Beat Sri Lanka, 1st T20I Match Full Highlights: न्यूझीलंडकडून श्रीलंकेचा 8 धावांनी पराभव; फलंदाजांनंतर गोलंदाजांचा धुमाकूळ; पहा सामन्याचे संपूर्ण हायलाइट्स