IPL Auction 2025 Live

Chris Jordan Hat-Trick: इंग्लिश वेगवान गोलंदाज ख्रिस जॉर्डनने टी-20 विश्वचषकात रचला इतिहास! अमेरिकविरुद्ध घेतली हॅटट्रिक (Watch Video)

प्रथम फलंदाजी करताना अमेरिकेने 115 धावांत 6 विकेट गमावल्या होत्या. 18 वे ओव्हर टाकायला आलेल्या ख्रिस जॉर्डनने एका फटक्यात खेळ फिरवला.

Chris Jordan (Photo Credit - X)

ENG vs USA: इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ख्रिस जॉर्डनने (Chris Jordan Hat-Trick) अमेरिकेविरुद्ध अप्रतिम हॅटट्रिक घेतली आहे. टी-20 विश्वचषकात ही कामगिरी करणारा जॉर्डन हा इंग्लंडचा पहिला गोलंदाज ठरला आहे. विशेष म्हणजे जॉर्डनचा जन्म बार्बाडोसमध्ये झाला असून इंग्लंडकडून खेळताना त्याने बार्बाडोसमध्येच ही कामगिरी केली. जॉर्डनच्या सततच्या घातक गोलंदाजीमुळे अमेरिका अवघ्या 115 धावांत गारद झाली. प्रथम फलंदाजी करताना अमेरिकेने 115 धावांत 6 विकेट गमावल्या होत्या. 18 वे ओव्हर टाकायला आलेल्या ख्रिस जॉर्डनने एका फटक्यात खेळ फिरवला. त्याने षटकाच्या पहिल्या चेंडूवर कोरी अँडरसनला (29) हॅरी ब्रूककडे झेलबाद केले. यानंतर त्याने तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर सलग विकेट घेत हॅट्ट्रिक पूर्ण केली. हॅट्ट्रिक करताना त्याने प्रथम अली खानला क्लीन बोल्ड केले. यानंतर पुढील दोन चेंडूंवर नॉस्तुश आणि नेत्रावलकर यांना अनुक्रमे एलबीडब्ल्यू आणि क्लीन बोल्ड करण्यात आले.

 

View this post on Instagram

 

A post shared by ICC (@icc)

टी-20 विश्वचषक 2024 मध्ये हॅट्ट्रिक घेणारा दुसरा गोलंदाज

ख्रिस जॉर्डन 2024 च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत हॅट्ट्रिक घेणारा दुसरा गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने ही कामगिरी केली आहे. कमिन्सने नॉर्थ साउंड येथे बांगलादेशविरुद्ध आणि किंग्सटाउन येथे अफगाणिस्तानविरुद्ध हॅटट्रिक केली होती. त्याचबरोबर, स्पर्धेच्या इतिहासात हॅट्ट्रिक घेणारा जॉर्डन हा केवळ आठवा गोलंदाज ठरला आहे. (हे देखील वाचा: Pat Cummins Hat-Trick: पॅट कमिन्सने इतिहास रचला, टी-20 वर्ल्ड कपमध्ये दोनदा हॅट्ट्रिक घेणारा ठरला जगातील पहिला गोलंदाज)

टी-20 विश्वचषकात हॅट्ट्रिक घेणारे गोलंदाज

ब्रेट ली (AUS) विरुद्ध बांगलादेश, केप टाउन, 2007

कर्टिस कॅम्फर (IRE) विरुद्ध नेदरलँड्स, अबू धाबी, 2021

वानिंदू हसरंगा (SL) विरुद्ध दक्षिण आफ्रिका, शारजाह, 2021

कागिसो रबाडा (SA) विरुद्ध इंग्लंड, शारजाह, 2021

कार्तिक मयप्पन (UAE) विरुद्ध श्रीलंका, गिलॉन्ग, 2022

जोश लिटल (IRE) वि न्यूझीलंड, ॲडलेड, 2022

पॅट कमिन्स (AUS) वि बांगलादेश, नॉर्थ साउंड, 2024

पॅट कमिन्स (AUS) विरुद्ध अफगाणिस्तान, किंग्सटाउन, 2024

ख्रिस जॉर्डन (ENG) वि यूएसए, ब्रिजटाउन, 2024