SA Vs ENG: कोरोनाचा कहर! इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिका रद्द
दरम्यान, क्रिकेट विश्वावरही मोठा परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोनामुळे इंलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना दोन वेळा रद्द करण्यात आला होता.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने संपूर्ण जगाला हादरून सोडले आहे. दरम्यान, क्रिकेट विश्वावरही मोठा परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोनामुळे इंलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना दोन वेळा रद्द करण्यात आला होता. मात्र, आता संपूर्ण मालिकाच रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दोन्ही देशांच्या क्रिकेट मंडळांनी हा निर्णय घेतला असून आता यापुढे हे सामने कधी खेळवायचे, याबाबतचा निर्णय मात्र अद्याप होऊ शकलेला नाही. दोन्ही संघ ज्या हॉटेलमध्ये होते तेथील कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. तसेच खेळाडूंच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना रविवारी कॅपटाऊन येथे खेळला जाणार होता. परंतु, रविवारी हा सामना होऊ शकला नव्हता आणि कोरोनामुळे एकच सामना दोनवेळा रद्द करण्याची वेळ आली होती. पण आता तर ही संपूर्ण मालिकाच रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एकदिवसीय मालिकेच्या आधी दोन्ही संघातील एका सदस्याला कोरोनाची संसर्ग झाल्याचे सांगितले जात आहे. हे देखील वाचा- Rohit Sharma येत्या 11 डिसेंबर करिता वजन कमी करण्यासाठी NCA मध्ये घेतोय विशेष मेहनत
ट्विट-
"आमच्या क्रिकेट मंडळासाठी खेळाडू आणि सपोर्ट स्टाफची सुरक्षा सर्वात महत्वाची आहे. दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आल्यावर काही गोष्टींमुळे आम्हाला चिंता नक्कीच होती. पण एवढी गंभीर अवस्था त्यावेळी नव्हती. पण सातत्याने या गोष्टी पाहायला मिळाल्यानंतर खेळाडूंच्या सुरक्षेसाठी इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही क्रिकेट मंडळांनी मालिका रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे." असे इंग्लंडच्या क्रिकेट संघटनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी टॉम हॅरिसन यांनी सांगितले आहे.