इंग्लंची महिला क्रिकेटपटू सारा टेलर हिने पुन्हा केली न्यूड 'फलंदाजी'; टीममेट अॅलेक्स हार्टलेने ट्रोल, पहा Photo
साराने पुन्हा एकदा सोशल मीडियावर कपड्यांविना फलंदाजी करतानाचा एक फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो शेअर करताच सारा सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चेत आली. साराच्या या पोस्टवर अनेक संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
इंग्लंडची (England) प्रसिद्ध महिला क्रिकेटपटू सारा टेलर (Sarah Taylor) हिने पुन्हा एकदा चाहत्यांना अचंभित केले. साराने पुन्हा एकदा सोशल मीडियावर कपड्यांविना फलंदाजी करतानाचा एक फोटो पोस्ट केला आहे. याआधी साराने महिलांच्या आरोग्याबद्दल जनजागृती करण्यासाठी न्यूड फोटोशूट केला होता. त्या फोटोशूटमध्ये सारा विकेटकिपिंग करताना दिसतेय. तो फोटो शेअर करताना साराने त्यासोबत महत्वाचा संदेशदेखील दिला आहे होता आणि यासाठी तिचे कौतुक देखील झाले होते. साराने सध्या जगभरात सुरू असलेल्या महिलांच्या आरोग्यविषयक समस्यांशी संबंधित अभियानांतर्गत काम करते. याच फोटोशूटमधील दुसरा फोटो शेअर करत साराने लिहिले की, "बॅटिंग करण्यासाठी वाट पहात आहे…" हा फोटो शेअर करताच सारा सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चेत आली. (इंग्लंडची महिला क्रिकेटपटू सारा टेलर हिने केला न्यूड फोटोशूट, महिलांना महत्वपूर्ण संदेश देत शेअर केला Photo)
साराच्या या पोस्टवर अनेक संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. पण या सर्वांच्या दरम्यान धक्कादायक बाब म्हणजे इंग्लंड क्रिकेट टीमची आणखी एक महिला खेळाडू अॅलेक्स हार्टले (Alex Hartley) हिनेने सारावर तापटपणे प्रतिक्रिया देत तिला फटकार लावली आहे. साराच्या पोस्टवर प्रतिक्रिया देत हार्टलेने लिहिले की, "नग्न अवस्थेत आपण किती क्रिकेट सामने खेळले आहेत?" इतकेच नाही तर हार्टलेने आपल्या दुसर्या कमेंटमध्ये साराला रोस्ट करत लिहिले की, "आपण कपड्यांशिवाय फलंदाजीची कधी वाट बघितली आहे?"
सारा तिच्या फलंदाजी आणि विकेटकीपिंगसाठी चांगली ओळखली जाते. पण, त्याचबरोबर ती सामाजिक बाबींविषयी उघडपणे मत व्यक्त करते. महिला सक्षमीकरणासाठी तिला आवाज उठवायचा आहे असे तिने या प्रकरणात सांगितले. सारा सध्या तिच्या काही वैयक्तिक समस्यांना सामोरे जात आहे आणि त्यामुळे ती इंग्लंड महिला क्रिकेट संघाचा भाग नाही आहे. असे म्हटले जात आहे की सारा चिंताग्रस्त अवस्थेमुळे अस्वस्थ आहे, परंतु तरीही ती अलिकडे सरे स्टार्सकडून खेळली होती. दरम्यान, यापूर्वी महिला अॅशेसदरम्यान सारा म्हणाली होती की लोकांनी मला या टप्प्यात कमकुवत समजावे असे तिला वाटत नाही.