ENG vs WI 1st Test Live Streaming: इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडीज पहिली टेस्ट भारतात कधी आणि कुठे पाहता येईल; लाइव्ह टेलिकास्ट, ऑनलाइन स्ट्रीमिंग; जाणून घ्या पूर्ण माहिती

भारतातील क्रिकेट चाहते ही मालिका 8 जुलै रोजी दुपारी 3:30 पासून सोनी Sony Six, Sony Six HD वर लाइव्ह पाहण्यास सक्षम असतील.

इंग्लंड, वेस्ट इंडिज (Photo Credit: Getty)

कोरोना व्हायरस लॉकडाऊननंतर इंग्लंड (England) आणि वेस्ट इंडीज (West Indies) टीममधील कसोटी मालिकेसह आंतरराष्ट्रीय क्रिकेटची सुरूवात होणार आहे. 8 जुलै पासून दोन्ही टीममध्ये 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाईल. पहिली कसोटी सामना साउथॅम्प्टन (Southampton) येथील रोज बॉल क्रिकेट ग्राउंडवर (Rose Bowl Cricket Ground) खेळला जाईल, दुसरा आणि तिसरा टेस्ट ओल्ड ट्रॅफर्ड, मॅनेचेस्टर 16 जुलै आणि 24 जुलै पर्यंत असेल. भारतामध्ये (India) देखील या मालिकेचे लाइव्ह टेलिकास्ट आणि ऑनलाइन स्ट्रीमिंग चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. कोरोना व्हायरसमुळे 13 मार्चपासून आंतराष्ट्रीय क्रिकेटवर ब्रेक लगले आहे. इंग्लंड-वेस्ट इंडीज कसोटी मालिका रिक्त स्टेडियममध्ये प्रेक्षकविना आयोजित होणार आहे. अशा परिस्थितीत शांत वातावरणात प्रेक्षकांच्या मनात किती थरार कसोटी क्रिकेट भरु शकते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. तीन कसोटी सामन्यांच्या या मालिकेतील पहिल्या सामन्याशी निगडीत सर्व माहिती जाणून घ्या. (ENG vs WI Test 2020: वेस्ट इंडिज खेळाडूंना इंग्लंड क्रिकेट टीमचा पाठिंबा, जर्सीवर लावणार Black Lives Matter चा लोगो)

भारतातील क्रिकेट चाहते ही मालिका 8 जुलै रोजी दुपारी 3:30 पासून सोनी Sony Six, Sony Six HD, Sony Ten Sports 1 आणि Sony Ten Sports 1 HD वर लाइव्ह पाहण्यास सक्षम असतील. पहिला कसोटी सामना रोज बाऊल येथे 8 ते 12 जुलै दरम्यान खेळला जाईल.  शिवाय, ऑनलाइन स्ट्रीमिंग SonyLiv अ‍ॅप वर उपलब्ध असेल.

दरम्यान, या मालिकेपासून क्रिकेटमध्ये काही नवीन नियमांची सुरुवात होईल. कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी आयसीसीकडून लाळेच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे, मात्र गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक चेंडूला चमकावण्यासाठी घामाचा वापर करू शकतात. विस्डेन ट्रॉफी स्पर्धेसाठी इंग्लंड-वेस्ट इंडिजमध्ये कठोर स्पर्धा पाहायला मिळू शकते. परदेशी भूमीवर विस्डेन ट्रॉफी वाचविण्याकडे वेस्ट इंडीजचे लक्ष लागून आहे आणि या संपूर्ण मालिकेत नव्या नियमांमुळे क्रिकेटच्या इतिहासात बरीच मोठी बदलांची नोंद होईल. दुसरीकडे, पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंड संघ नियमित कर्णधार जो रूटशिवाय मैदानात उतरेल. अशा स्थितीत बेन स्टोक्सकडे नेतृत्व सोपविण्याचा निर्णय ईसीबीने घेतला आहे. याखेरीज इंग्लंडच्या संघाने दोन दिवसांपूर्वी मालिकेच्या पहिल्या सामन्यासाठी 13 सदस्यांच्या संघाची घोषणा केली आहे.

पहिल्या टेस्टसाठी इंग्लंड टीम

बेन स्टोक्स (कॅप्टन), जेम्स अँडरसन, जोफ्रा आर्चर, डॉमनिक बेस, स्टुअर्ट ब्रॉड, रोरी बर्न्स, जोस बटलर, जॅक क्रॉवल, जो डेन्ली, ओली पोप, डोमिनिक सिबली, क्रिस वोक्स आणि मार्क वुड

वेस्ट इंडिज टीम

जेसन होल्डर (कॅप्टन), शेन डोवरिच (विकेटकीपर), जर्मेन ब्लैकवुड, नकरमाह बोनर, क्रॅग ब्रॅथवेट, शरमार्ह ब्रूक्स, जॉन कॅम्पबेल, रोस्टन चेस, रहकीम कॉर्नवॉल, केमर होल्डर, शाई होप, अल्जारी जोसेफ, रेमन रीफर आणि केमर रोच.