England vs Australia 1st T20 2024 Highlights: टी20 सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाची आघाडी, इंग्लंड 28 धावांनी पराभूत; जाणून घ्या ठळक घडामोडी

हा सामना साउथेम्प्टन ये 'द रोज बाउल स्टेडियम'मध्ये 11 सप्टेंबर रोजी खेळला गेला. ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला (England) जोरदार टक्कर देत 28 धावांनी पराभूत केले.

Travis Head (Photo: X)

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया (England vs Australia 1st T20 2024 Highlights) या दोन देशांचे क्रिकेट संघ टी-20 सामन्यांसाठी (T-20 Highlights) मैदानात उतरले. हा सामना साउथेम्प्टन ये 'द रोज बाउल स्टेडियम'मध्ये 11 सप्टेंबर रोजी खेळला गेला. ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला (England) जोरदार टक्कर देत 28 धावांनी पराभूत केले. या विजयामुळे कांगारुंच्या देशाने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियासाठी (Australia) गोलंदाजांची कामगिरी विशेष फायद्याची ठरली. खास करुन सीन एबॉट याने 3.2 षटकांच्या बदल्यात दिलेल्या 28 धावांमध्ये घेतलेले 3 बळी. याशिवाय फलंदाज म्हणून ट्रेविस हेड याने 59 धावांची दमदार खेळीही कामास आली.

ऑस्ट्रेलियन फलंदाजांना इंग्लंडच्या गोलंदाजांची टक्कर

संपूर्ण सामन्याचे विश्लेषण करायचे तर, इंग्लंडने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ज्यामुळे ऑस्ट्रेलियाला फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरावे लागले. इंग्लंडच्या भेदक गोलंदाजीपुढे ऑस्ट्रेलियाचे फलंदाज लवगरच गारद झाले. त्यामुळे केवळ 19.3 षटकांमध्ये या संघाला केवळ 179 धावाच जमवता आल्या. त्यातही ट्रेविस हेड याची 23 चेंडूंमध्ये ठोकलेल्या 59 धावांची कामगिरी विशेष कौतुकास्पद ठरली. त्याने 8 षटकार, 4 चौकारांची भर घालत ही कामगिरी केली. याशिवाय, मॅथ्यू शॉर्ट यानेही 26 चंडूंमध्ये 41 धावा केल्या. तर, कर्णधार मार्श याने अतिशय सुमार कामगिरी करत 3 चेंडूमध्ये 2 धावा करण्याचा प्रयत्न केला. (हेही वाचा, Duleep Trophy 2024 Second Round Live Streaming: आजपासून सुरु होणार दुसऱ्या फेरीचे सामने, तुम्ही 'या' ओटीटवर विनामूल्य पाहू शकता लाइव्ह स्ट्रीमिंग सामना)

इतर फलंदाजांची कामगिरी

ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी इंग्लंडच्या फलंदाजांना जखडले

ऑस्ट्र्रॅलियाने ठेवलेल्या 180 धावांच्या लक्ष्याचा पाटलाग करताना इंग्लंडचा संघ 19.2 षटकांवर 151 धावा करत सर्वबाद झाला. परिणामी विजयासाठी कमी पडलेल्या 28 धावा घेऊन हा संघ पराभूत झाला. इंग्लंडसाठी लियमन लिविंगस्टोन याने सर्वाधिक 27 चेंडूत 37 धावा केल्या. याशिवाय कर्णधार फील साल्ट याने 12 चेंडूमध्ये 20 धावा केल्या. (हे देखील वाचा: ICC Test Ranking: रोहित शर्माने 3 वर्षांनंतर टॉप-5 मध्ये केला प्रवेश, विराट आणि यशस्वीनेही रँकिंगमध्ये घेतली मोठी झेप)

इंग्लंडचा धावफलक

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये कसा झाला खेळ

दरम्यान, ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजी करताना सीन एबॉट याने 3.2 षटकांध्ये 28 धवांच्या बदल्यात 3 गडी बाद केले. अलावा जेवियर बार्लेट, कैमरून ग्रीन आणि मार्कस स्टोइनिस यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. तर, जोश हेजलवुड, एडम जम्पा यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.