England vs Australia 1st ODI Live Scorecard: पहिल्या वनडेत इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला दिले 316 धावांचे लक्ष्य, बेन डकेटची 95 ची शानदार खेळी
इंग्लंडकडून सलामीवीर बेन डकेटने सर्वाधिक 95 धावांची खेळी खेळली. या खेळीदरम्यान बेन डकेटने 11 चौकार मारले. बेन डकेटशिवाय विल जॅकने शानदार 62 धावा केल्या.
इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात तीन सामन्यांची T20 आंतरराष्ट्रीय मालिका 2024 खेळली गेली. ही मालिका 1-1 अशी बरोबरीत संपली. आज 19 सप्टेंबर रोजी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिला एकदिवसीय सामना खेळला जात आहे. नॉटिंगहॅमच्या ट्रेंट ब्रिज स्टेडियमवर दोन्ही संघांमधील हा सामना खेळला जात आहे. नियमित कर्णधार जोस बटलर अद्याप दुखापतीतून सावरला नसल्यामुळे इंग्लंडने हॅरी ब्रूकला या मालिकेसाठी कर्णधार म्हणून नियुक्त केले आहे. तर मिचेल मार्श ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. या मालिकेत दोन्ही संघांनी अनेक युवा खेळाडूंना संधी दिली आहे. (हेही वाचा - India vs Bangladesh 1st Test Day 1 Stumps Scorecard: शतकवीर अश्विन - जाडेजांनी भारताचा डाव सावरला, पहिल्या दिवसाअखेर भारत 6 बाद 339)
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला वनडे सामना 1971 मध्ये खेळला गेला होता. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत 156 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. या कालावधीत ऑस्ट्रेलियाने 88 सामने जिंकले आहेत, तर इंग्लंडने 63 सामने जिंकले आहेत. त्याच वेळी, 2 सामने टाय झाले आहेत आणि 3 सामन्यांचा निकाल लागला नाही. दरम्यान, इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूकने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
पाहा स्कोरकार्ड -
इंग्लंडचा संपूर्ण संघ 49.4 षटकांत 315 धावा करून ऑलआऊट झाला. इंग्लंडकडून सलामीवीर बेन डकेटने सर्वाधिक 95 धावांची खेळी खेळली. या खेळीदरम्यान बेन डकेटने 11 चौकार मारले. बेन डकेटशिवाय विल जॅकने शानदार 62 धावा केल्या. या दोघांशिवाय फिलिप सॉल्ट 17 धावा, कर्णधार हॅरी ब्रूक 39 धावा, जेमी स्मिथ 23 धावा, लियाम लिव्हिंगस्टोन 13 धावा, ब्रायडन कारसे 2 धावा, जेकब बेथेल 35 धावा, जोफ्रा आर्चर 4 धावा, मॅथ्यू पॉट्स नाबाद 11 आणि आदिल रशीद 0 धावा.
ऑस्ट्रेलियाकडून ॲडम झाम्पा आणि मार्नस लॅबुशेन यांनी प्रत्येकी सर्वाधिक तीन बळी घेतले. ॲडम झाम्पा आणि मार्नस लॅबुशेन यांच्याशिवाय ट्रॅव्हिस हेडने दोन फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले, मॅथ्यू शॉर्ट आणि बेन द्वारशुइसने प्रत्येकी एक विकेट घेतली. हा सामना जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियन संघाला 50 षटकात 316 धावा करायच्या आहेत.