ENG vs SL 3rd Test Day 2 Live Score Update: इंग्लंडचा पहिला डाव 325 धावांवर आटोपला, कर्णधार ऑली पोपने शानदार शतक झळकावले; येथे पाहा स्कोअरकार्ड
पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडच्या संघाने 44.1 षटकांत तीन गडी गमावून 221 धावा केल्या होत्या. नाणेफेक गमावल्यानंतर इंग्लंड पहिल्या डावात फलंदाजीला उतरला आणि दोन्ही सलामीवीरांनी पहिल्या विकेटसाठी 45 धावा जोडल्या
England National Cricket Team vs Sri Lanka National Cricket Team: इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ (England National Cricket Team) आणि श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघ (Sri Lanka National Cricket) यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसऱ्या सामन्याला शुक्रवारपासून लंडनमधील केनिंग्टन ओव्हल स्टेडियमवर खेळला जात आहे. इंग्लंडने मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. इंग्लंड संघाचे नेतृत्व ऑली पोप करत आहेत तर श्रीलंकेचे नेतृत्व धनंजय डी सिल्वा करत आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरूच आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडच्या संघाने 44.1 षटकांत तीन गडी गमावून 221 धावा केल्या होत्या. नाणेफेक गमावल्यानंतर इंग्लंड पहिल्या डावात फलंदाजीला उतरला आणि दोन्ही सलामीवीरांनी पहिल्या विकेटसाठी 45 धावा जोडल्या. कर्णधार ऑली पोपने पहिल्या डावात इंग्लंडकडून 154 धावांची सर्वोत्तम खेळी खेळली. या खेळीत ओली पोपने दोन षटकार आणि 19 चौकार लगावले.
पहिल्या डावात इंग्लंडचा संपूर्ण संघ 69.1 षटकात 325 धावा करत सर्वबाद झाला. ऑली पोपशिवाय बेन डकेटने 86 धावा केल्या. श्रीलंकेकडून मिलन प्रियनाथ रथनायकेने सर्वाधिक तीन बळी घेतले. मिलन व्यतिरिक्त प्रियनाथ रथनायके, लाहिरू कुमारा, विश्व फर्नांडो आणि कर्णधार धनंजय डी सिल्वा यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.
तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यासाठी इंग्लंड आणि श्रीलंका या दोन्ही संघांनी आपापल्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली होती. इंग्लंडने युवा जोश हलचा समावेश प्लेइंग इलेव्हनमध्ये केला आहे. तत्पूर्वी, श्रीलंकेचा कर्णधार धनंजय डी सिल्वाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.