England खेळाडूंमध्ये भीतीचं वातावरण, New Zealand विरुद्ध दुसऱ्या टेस्टसाठी इंग्लिश संघात निवड होताच या 23-वर्षीय खेळाडूने बंद केलं ट्विटर अकाऊंट

किवी संघाविरुद्ध होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लिश संघात निवड झाल्यावर बेसने आपला ट्विटर अकाउंट बंद केले आहे.

डोम बेस (Photo Credit: Twitter/@EnglandCricket)

इंग्लंडचा (England) वेगवान गोलंदाज ओली रॉबिन्सनला (Ollie Robinson) 8 वर्षापूर्वी केलेल्या ट्वीटची किंमत आज मोजावी लागली आहे कारण निवड समितीने त्याला न्यूझीलंडविरुद्ध (New Zealand) दुसर्‍या कसोटी सामन्यातून बाहेर केले आहे आणि डोम बेसच्या (Dom Bess) निवडीसाठी मार्ग मोकळा केला. रॉबिनसनला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निलंबित करण्यात आल्यामुळे सध्या इंग्लंडच्या इतर खेळाडूंमध्ये भीतीचं वातावरण आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही आणि याच उदाहरण नुकतंच पाहायला मिळत आहे. किवी संघाविरुद्ध होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लिश संघात निवड झाल्यावर बेसने आपला ट्विटर अकाउंट बंद केले आहे. बेसच्या या कृतीमागे नक्की कोणते कारण आहे याचा अद्याप खुलासा झालेला नाही पण ओली रॉबिनसनच्या प्रकरणानंतर खेळाडूंनी खबरदारीचा उपाय म्हणून सोशल मीडिया अकाउंट बंद केले आहे. (Ollie Robinson च्या निलंबनानंतर ECB ला दुसर्‍या अज्ञात क्रिकेटपटूच्या सोशल मीडियावर वर्णद्वेषी ट्विटचा फटका, चौकशीला सुरुवात)

इंग्लंडमध्ये वर्णद्वेषाशी संबंधित मुद्द्यांना खपवून घेतले जात नाही, कोणत्या खेळाशी ते निगडित असो. स्पोर्ट्स बॉडीजद्वारे असे गैरवर्तन रोखण्यासाठी अनेक उपाय केले गेले आहेत ज्यात संपूर्ण सोशल मीडिया बहिष्कार तसेच खेळ सुरू होण्यापूर्वी गुडघा टेकण्याच्या कृतीचाही समावेश आहे. तथापि, यापूर्वी पोस्ट केलेल्या काही ट्विटमुळे रॉबिनसन अडचणीत सापडला आणि आता, बेसने त्याचे ट्विटर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. रॉबिनसनने 8 वर्षांपूर्वी केलेलं वर्णद्वेषी आणि लिंगभेदी ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले असून तपास पूर्ण होईपर्यंत रॉबिनसनचं निलंबन करण्यात आलं आहे. पण बेसने त्याचं ट्विटर अकाऊंट का बंद केलं, याबाबत मात्र अजून माहिती मिळू शकलेली नाही.

डोम बेस ट्विटर अकाउंट (Photo Credit: Twitter/Screenshot)

दरम्यान, इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्ड (ईसीबी) रॉबिंसनच्या ट्विटर पोस्टची चौकशी करत असल्याचे समजले आहे आणि आणखी एक इंग्लिश खेळाडूने असे 'आक्षेपार्ह' ट्विट पोस्ट केलेल्याचे आढळले आहे. बोर्डाने खेळाडूची ओळख जाहीर न करण्याचा निर्णय घेतला आहे परंतु इंग्लंड संघातील काही क्रिकेटपटू या परिस्थितीमुळे सतर्क झाल्याचे दिसत आहे.