कसोटी कर्णधार बनताच Ben Stokes याचा मोठा निर्णय, इंग्लंडसाठी Joe Root ‘या’ क्रमांकावर करणार फलंदाजी
इंग्लंडचा नवा कसोटी कर्णधार बेन स्टोक्सने आपल्या संघाची रूपरेषा तयार करण्याची तयारी सुरू केली आहे. जो रूट कोणत्या क्रमांकावर फलंदाजी करेल हे देखील बेन स्टोक्सने स्पष्ट केले आहे. वेस्ट इंडिजकडून ब्रिटिश संघाचा 0-1 असा पराभव झाल्यानंतर, रुट कसोटी कर्णधार म्हणून पायउतार झाला. त्यानंतर इंग्लंड बोर्डाने स्टोक्सकडे नेतृत्वाची जबाबदारी सोपवली. \
इंग्लंडचा नवा कसोटी कर्णधार बेन स्टोक्सने (Ben Stokes) आपल्या संघाची रूपरेषा तयार करण्याची तयारी सुरू केली आहे. जो रूट (Joe Root) कोणत्या क्रमांकावर फलंदाजी करेल हे देखील बेन स्टोक्सने स्पष्ट केले आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी (New Zealand Test) मालिकेपूर्वी स्टोक्सने सांगितले की, रूट चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करेल. इंग्लंडचा धाकड अष्टपैलू रूटबद्दल म्हणाला की, “मी त्याच्याशी आधीच बोललो आहे. मी त्याला चौथ्या क्रमांकावर परतण्यास सांगितले आहे आणि मी 6 व्या क्रमांकावर फलंदाजी करेन. कोणी कुठेही फलंदाजी करतात, धावा होतात पण त्यांची सर्वोत्तम स्थिती चौथ्या क्रमांकावर असते. मला वाटते की तो चौथ्या क्रमांकावर असेल आणि मी सहाव्या क्रमांकावर असेल ज्यामुळे संघाला अनुभवाचा फायदा होईल. यामुळे 3 आणि 5 व्या क्रमांकावरील जागा रिक्त राहतील.” (Ben Stokes ने कर्णधार बनताच केला कहर; 64 चेंडूत ठोकले सर्वात जलद शतक, IPL सोडून काउंटी चॅम्पियनशिपमध्ये करतोय धमाल)
अष्टपैलू खेळाडूने सांगितले की, मधल्या फळीत फलंदाजी करताना रूट सर्वोत्तम खेळ करतो आणि कसोटी क्रिकेट पुन्हा सुरू झाल्यावर तो धावा करेल. थ्री लायन्सने शेवटच्या 17 सामन्यांपैकी फक्त एकच सामना जिंकू शकला आहे त्यामुळे कसोटी क्रिकेटमध्ये सर्वोत्तम वेळ अनुभवला नाही. जून महिन्यात न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिकेत संघ मैदानात उतरेल. मालिकेतील पहिली कसोटी 2 जूनपासून लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर सुरू होईल. वेस्ट इंडिजकडून ब्रिटिश संघाचा 0-1 असा पराभव झाल्यानंतर, रुट कसोटी कर्णधार म्हणून पायउतार झाला. त्यानंतर इंग्लंड बोर्डाने स्टोक्सकडे नेतृत्वाची जबाबदारी सोपवली. दरम्यान, चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना रुटची सरासरी 39.67 च्या तुलनेत 51.27 इतकी आहे. इंग्लंडच्या आगामी सामन्यांमध्ये रुट अधिक धावा करेल असा स्टोक्सला आत्मविश्वास आहे.
गोलंदाजीटी जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड या अनुभवी जोडीच्या पुनरागमनाचे जाहीरपणे समर्थन केल्यानंतर, स्टोक्स म्हणाला की संघाकडे रोमांचक पर्याय उपलब्ध आहेत आणि नियोजित रोटेशन धोरणाच्या विरोधात सर्वोत्तम इलेव्हन निवडण्याचा त्यांचा हेतू आहे. काही खेळाडूंच्या दुखापतींचा अडथळा कायम आहेत. तथापि जोफ्रा आर्चर, ऑली स्टोन आणि मार्क वुड अजूनही उपलब्ध असताना सॅम कुरन Surrey साठी पुन्हा खेळात आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)